लातूर : प्रतिनिधी
आपल्या डॉक्टरकीच्या पेशाशी नेहमी प्रामाणिक राहून रुग्णांची सेवा करा, असे आवाहन खासदार शिवाजीराव काळगे यांनी केले. येथील प्रसिद्ध डॉ. फरिद यांच्या ‘पटवारी डेंटल क्लिनिक’चे भव्य उद्घाटन राजर्षी शाहू महाराज चौक लातूर येथे शुक्रवार, ६ नोव्हेंबर रोजी खासदार काळगे यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी लातूरच्या महापौर जयश्रीताई सोनकांबळे या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक ‘एकमत’चे व्यवस्थापकीय संपादक मंगेश देशपांडे-डोंग्रजकर आणि ‘व्हीडीएफ’च्या प्रमुख संगीताताई मोळवणे, शारदा फाऊंडेशनचे मयुर बनसोडे, उपस्थित होते.

प्रमुख उपस्थितीमध्ये याप्रसंगी लातूर प्रभाग चारचे नगरसेवक सचिन गायकवाड, गोरीबी बागबान, अहेमदखान पठाण, कौसर शेख, प्रभाग ५ चे नगरसेवक मंगेश सोनकांबळे, आरीफ खानापुरे (नगरसेवक लोहारा, जि. धाराशिव), नगरसेवक शमाबी आयुब शेख, (नगरसेवक, लोहारा), माजी शिक्षण सभापती धाराशिव गुलमीर पठाण, माजी नगरसेवक हकीम शेख आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘एकमत’चे वृत्त संपादक वसिष्ठ घोडके यांनी केले.
शाहिदा पठाण यांच्या कष्टाचे कौतुक :
संपादक मंगेश डोंग्रजकर

यावेळी बोलताना दैनिक ‘एकमत’चे व्यवस्थापकीय संपादक मंगेश देशपांडे-डोंग्रजकर यांनी शाहिदा पठाण यांच्या कौटुंबिक प्रवासाला उजाळा दिला. ते म्हणाले, शाहिदा पठाण यांचा संपूर्ण संघर्षमय प्रवास मी अगदी सुरुवातीपासून जवळून पाहिला आहे. त्यांचा ‘एकमत’मधील प्रवेश माझ्याच हाताने झाला होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी आपल्या मोठ्या मुलाला आणि मुलीला डॉक्टर बनवले. आता त्यांच्या सर्वांत लहान मुलाचाही एमबीबीएससाठी प्रवेश झाला आहे. एकाच कुटुंबात तीन-तीन डॉक्टर घडवणा-या पठाण परिवाराचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
रुग्णसेवेचा नवा संकल्प आणि शुभेच्छा : खासदार काळगे
क्लिनिकचे उद्घाटक खासदार शिवाजीराव काळगे यांनी डॉ. फरिद यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञान बदलत असले, तरी रुग्णांविषयीची आत्मीयता आणि प्रामाणिकपणा हीच डॉक्टरची खरी पुंजी असते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
महापौर जयश्री सोनकांबळे यांनी लातूरकरांच्या सेवेत एका अद्ययावत डेंटल क्लिनिकची भर पडल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तर व्हीडीएफच्या प्रमुख संगीताताई मोळवणे यांनीही आपल्या मनोगतातून डॉ. फरिद आणि पटवारी क्लिनिकला पुढील यशस्वी वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. या उद्घाटन सोहळ्याला लातूर शहरातील अनेक नामांकित डॉक्टर, राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन पठाण व पटवारी परिवाराच्या वतीने करण्यात आले.
मान्यवर मंडळीसह, सय्यद पटवारी, अहेमद पठाण, दस्तगीर शेख, जुबेर शेख, इरफान देशमुख, अब्दुल शेख, फैज मिडिकल परिवार, भाऊसाहेब उमाटे, दीपक गायकवाड, शमशोद्दीन शेख, युनूस पठाण, अमजत पठाण, फय्याज पठाण, आसिफ बागवान, इस्माईल शेख, शहबाज पठाण, इम्तियाज शेख, जमीर पठाण, मुस्द्दीक शेख,अमन शेख, सुभान शेख, मलिक पटवारी, नंदा देशपांडे, नंदिनी गोरे, विद्या देशपांडे, दीपाली देशपांडे, शर्मिष्ठा माळी, वसिष्ठ घोडके, छाया घोडके, जनक सूर्यवंशी, सुशील मानवतकर, अविनाश जोशी, विनोद माळी, विक्रम कातळे, संदीप तिरुखे, माधव चोपडे, योगीराज पिसाळ, राजहंस कांबळे, शहजादी शेख, शीलाताई वाघमारे, इंदू बटनपूरकर, लक्ष्मी बटनपूरकर, रेखा शिखरे, बाबा मस्तान, शिरीष शेरखाने, वाघमारे सर, नसीमा पठाण, गौसिया पठाण, सानिया पठाण, जकीया शेख, बशीर शेख, महेबूब शेख, आतिक शेख, नबी शेख, बरकत शेख, चांदपाशा पठाण , अजीम शेख, उमरदराजखान, डॉ. अल्फूर पठाण, डॉ. बनसोडे, शमशोद्दीन काजी, ज्ञानेश्वर शाळेचे मुख्याध्यापक मलवाडे सर, पत्रकार अशपाक पठाण, पत्रकार समद शेख, ‘एकमत’चे पत्रकार एजाज शेख यांच्यासह सामाजिक, राजकीय व पत्रकार क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी पटवारी कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या.
















