31.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूरसामाजिक सलोखा बिघडवणा-या भाजपाला धडा शिकवा

सामाजिक सलोखा बिघडवणा-या भाजपाला धडा शिकवा

लातूर : प्रतिनिधी 
समाजा समाजात भांडणे लावून स्वताची पोळी भाजप भाजत आहे, त्यामुळे आज राज्यातील सामाजीक सलोखा  बिघडत चालला आहे. धनगर, मराठा या समाजाला आरक्षण देतो म्हणून विद्यमान सरकारने फसवले आहे, आता हे सगळे उघड झाले आहे. त्यामुळे आता त्यांच्या भुलाथापांना बळी न पडता काँग्रेस महाविकास आघाडीला सर्व समाजाने पाठींबा दयावा, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी केले आहे.
लातूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ सोमवार दि. २९ एप्रिल रोजी दुपारी अहमदपूर तालुक्यातील खंडाळी येथे आयोजीत सभेत लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भूषणसिंह राजे होळकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री विनायकराव पाटील, लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी, अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे निरीक्षक माजी महापौर  विक्रांत गोजमगुंडे, अहमदपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. गणेश कदम, एन. आर. पाटील चंद्रकांत मद्दे, रामभाऊ बेल्लाळे, सिराज जहागीरदार, भारत रेड्डी, सोमेश्वर कदम, ज्योतीताई पवार, निलेश देशमुख, डॉ. सतीश बिराजदार, आर.डी शेळके, भाग्यश्री क्षिरसागर सांब महाजन, व्यंकटराव पाटील, श्रीकांत बनसोडे, हरिभाऊ येरमे, मारुती माने, अशोक पाटील आदींसह काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व मान्यवरांनी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. यावेळी बोलतांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर म्हणाले की, आज देशाची परिस्थिती पाहताना आम्हाला वाटले आज लोकांबरोबर उतरण्याची गरज आहे. महाराष्ट्राची भूमी ही वारक-यांची आहे, तसेच ही भूमी धारक-यांचीही आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जनतेची कामे करण्याची शिकवण दिली. जनतेला केंद्रस्थानी मानून अनेक नेत्यांनी काम केले. परंतु आज राजकारणात एकमेकांना शत्रू म्हणून पाहिले जाते.  सन २०१४ मध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले अच्छे दिन आने वाले है परंतु ते आले नाहीत. सुशिक्षित बेरोजगारांना दोन कोटी रोजगार त्यांनी दिले नाही.
 सरकार नुसते गाजरे दाखवते. शेतक-यांची कर्जमाफी पंतप्रधान मनमोहन सिंग व देशाचे कृषिमंत्री शरद पवार यांच्या काळात झाली. भाजपने रामाच्या नावावर राजकारण न करता कामावर राजकारण करावे असे सांगून  भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणाले पण त्यांनी ते दिले नाही. आरक्षणासाठी काही काम त्यांनी केले नाही. धनगर समाजासाठीच्या शासकीय योजनांचा लोकांना फायदा होत नाही. धनगर समाजासाठी काहीही भाजपने केले नाही, ते फक्त ओबीसी समाज मराठा समाजात भांडणे लावण्याचे काम करतात. कर्नाटक राज्यात काँग्रेसने धनगर समाजाचे सिद्धरामय्यांना मुख्यमंत्री केले असे देश विरोधी घोटाळेबाज भाजप सरकार तडीपार करा, जनतेने आपले प्रश्न सोडवण्यासाठी येत्या ७ मे रोजी लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या नावासमोरील हात चिन्हाचे बटन दाबून त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले. देशात व राज्यात सत्ता बदल घडणार आहे
भाजप विरुद्ध भारतीय जनता, अशी होत आहे निवडणूक
माजी मंत्री विनायकराव पाटील म्हणाले की, जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे. इंग्रजांपेक्षाही भाजपशाही परवडणारी नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व सामान्यांना मतदानाचा अधिकार दिला आहे.  आता भाजपच्या पायाखालची वाळू घसरली आहे, जनता आता या निवडणुकीत त्यांना निवडून देणार नाही, भाजप विरुद्ध भारतीय जनता अशी ही निवडणूक होत आहे. भविष्यात देशात सर्वत्र खाजगीकरण ते करणार आहेत, असे त्यांनी सांगितले. काँग्रेसने कर्नाटक तेलंगणात जे वचन दिले त्याची पूर्तता त्यांनी तेथे केली आहे. भाजप म्हणाले होते आमचे सरकार आले की पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ पण त्यांनी धनगर समाजाला आरक्षण दिले नाही. जात धर्म पंथ यांचा विचार न करता सर्वांनी येत्या ७ मे रोजी लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या नावासमोरील हात चिन्हाचे बटन दाबून मला विक्रमी मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
भाजपाला सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे देणे-घेणे नसलेल्या भाजपाला धडा
लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे म्हणाले की, मागच्या दहा वर्षात भाजप सरकारने सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाकडे डोळेझाक केली. भाजप खासदार या भागात आले नाहीत या भागासाठी काही काम त्यांनी केले नाही, मी शेतक-यांचा मुलगा आहे. भाजप सरकारने शेतक-यांची अडवणूक पदोपदी केली, शेतक-यांच्या  शेतीमालाला भाव मिळत नाही. कांदा गुजरातमधून निर्यात होतो, पण महाराष्ट्रातून निर्यात होत नाही. या सरकारला धडा शिकवा काँग्रेसने जनतेला गॅरंटी कार्ड दिले आहे.
सर्वसामान्यांच्या प्रश्नांच देणे घेणे भाजपला नाही म्हणून हे राज्यकर्ते बदला असे सांगून येत्या ७ मे रोजी लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या नावासमोरील हात चिन्हाचे बटन दाबून मला विक्रमी मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमात शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी यांनी मनोगत व्यक्त केले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बालाजी देवकते  यांनी केले तर शेवटी आभार मारोती माने यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR