सोलापूर-गोवा, सोलापूर-हैदराबाद विमानसेवा बंद

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूरकरांसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर-गोवा आणि सोलापूर-हैदराबाद विमानसेवा पुढील ३ महिन्यांसाठी बंद करण्यात आली आहे. मान्सूनमुळे निर्माण होणा-या हवामानाचा विचार करून फ्लाय- ९१ कंपनीने हा निर्णय घेतला असून १९ जूनपासून या दोन्ही मार्गांवरील तिकिट विक्रीही थांबवण्यात येणार आहे.

फ्लाय-९१ कंपनीच्या माहितीनुसार, सोलापूर विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा अद्याप उपलब्ध नसल्याने पावसाळ्यात कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत विमानसेवा सुरक्षितपणे चालवणे कठीण ठरत आहे. यामुळे सोलापूर-गोवा आणि सोलापूर-हैदराबाद या दोन्ही मार्गांवरील उड्डाणे किमान दोन ते तीन महिन्यांसाठी बंद करण्यात आली आहेत.

विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या या विमानसेवेला सोलापूरसह लातूर, धाराशिव, विजयपूर आणि कलबुर्गी परिसरातील प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. कमी वेळेत प्रवासाची सुविधा उपलब्ध झाल्याने या मार्गावरील प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत होती. वाढत्या मागणीमुळे काही वेळा तिकिटांचे दर तब्बल १० हजार रुपयांपर्यंत पोचल्याचेही पाहायला मिळाले. मात्र मान्सूनच्या काळात वारंवार हवामानातील बदल, कमी दृश्यमानता आणि उड्डाणांमध्ये होणारा उशीर यामुळे विमानसेवा विस्कळीत होण्याचे प्रकार घडले होते. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कंपनीने तात्पुरती सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, विमानसेवा बंद असली तरी सोलापूर विमानतळावरील फ्लाय-९१ कंपनीची यंत्रणा आणि कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. फ्लाय-९१चे प्रमुख मनोज चाको यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती अनुकूल राहिल्यास सेवा अपेक्षेपेक्षा लवकर सुरू होऊ शकते. अन्यथा ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यापासून सोलापूर-गोवा आणि सोलापूर-हैदराबाद विमानसेवा पूर्ववत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गांवरून नियमित प्रवास करणा-या प्रवाशांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अयोध्येत रामललाच्या चरणी यामी गौतम; दर्शन आणि आशीर्वादानंतर केले 'नई नवेली' चित्रपटाचे प्रमोशन.
00:53
Video thumbnail
Hingoli|जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ॲक्शन मोडमध्ये!तहसील कार्यालयात अचानक धडक
02:31
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो, गुंठेवारीची प्रकरणे दाखल केलीत का? ३१ डिसेंबर अंतिम मुदत!
01:10
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उत्सुकता वाढली! दोन दिवसांत २२९ अर्जांची विक्री
02:47
Video thumbnail
Latur|ऐन दुष्काळात आगीचं तांडव, 15 एकर ऊस जळून खाक #breakingnews
00:26
Video thumbnail
Latur|बशीर शेखच्या इमारतींचा वाद; कागदपत्रांसाठी महापालिकेकडे वेळेची मागणी!
04:15
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो सावधान! नळाला तोटी नसेल तर २५ हजारांचा दंड; महापालिकेचा अलर्ट
02:39
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
21:34
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
00:00
Video thumbnail
Latur|आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी RTO चा सुरक्षा कवच!
06:24
Video thumbnail
Purna|बळीराजा साखर कारखान्याच्या १३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसाला ३,३००.७६ रुपये भाव जाहीर
02:36
Video thumbnail
Latur Drought|लातूरच्या दुष्काळावर तोडगा कधी? निलंगेकरांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक
02:25
Video thumbnail
Bashir Shaikh|लातूरच्या बशीर शेखविरोधात POCSO अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल!
03:21
Video thumbnail
Tuljapur|तुळजाभवानी मंदिरात पोलिसांची दादागिरी? सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
00:39
Video thumbnail
Latur|पदवीधर निवडणुकीत वचननाम्यावरून वाद! बालाजी पाटील चाकूरकर अडचणीत येणार?
02:16

Latest news