31.7 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeसोलापूरसोलापूर जिल्ह्यांमध्ये चारा छावणी सुरु करण्याची मागणी

सोलापूर जिल्ह्यांमध्ये चारा छावणी सुरु करण्याची मागणी

सोलापूर :भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे सोलापूर जिल्ह्यांमध्ये चारा छावणी सुरु करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पै.माऊली हेगडे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्य सचिव यांच्याकडे केली आहे.महाराष्ट्र राज्यांमध्ये गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे बहुतांश भागात भीषण पाणी टंचाई आणि चाऱ्याची कमतरता आहे.

लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे.जनावरांसाठी देखील चारा उपलब्ध होत नाही. दुष्काळी उपाययोजनांच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यामध्ये चारा डेपो किंवा चारा छावण्या सुरु करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पै.माऊली हेगडे यांनी केली आहे.

सदर निवेदनामध्ये पै.माऊली हेगडे यांनी नमूद केले आहे की,सोलापूर जिल्ह्यांमध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती आहे.सोलापूर जिल्ह्याचा बहुतांश भाग हा शेतीच्या पाण्यासाठी,पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणावर अवलंबून आहे.गेल्या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये पाऊस कमी झाल्याने उजनी धरणामध्ये पाणीसाठा कमी झाला. त्यामुळे,दुष्काळाच्या तीव्रतेमध्ये वाढ झाली आहे.पाणी नसल्यामुळे शेतकरी आणि पशुपालक मोठ्या संकटामध्ये आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR