33.2 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeसोलापूरसोलापूर जिल्ह्यात उष्माघाताचे चौदा रूग्ण

सोलापूर जिल्ह्यात उष्माघाताचे चौदा रूग्ण

सोलापूर : शहर व जिल्ह्यात उष्माघाताचा त्रास असणारे रुग्ण सलाईन, ग्लुकोज आदी घेत आहेत. कने वाढत्या तापमानामुळे अनेकांना भोवळ येणे, डोके दुखणे, ताप येणे आदी उष्माघाताची लक्षणे आहेत. मात्र, शासनाकडे जिल्ह्यातील फक्त १४ रुग्णांचीच नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने शासनाकडे उष्माघाताच्या रुग्णांची माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

मागील काही दिवसांत उन्हाचा पारा वाढला असून, तो कमी व्हायचे नाव घेत नाही. हा पारा सातत्याने वाढत असल्याने उष्माघाताच्या रुग्णांची संख्यादेखील वाढू लागली आहे. उष्माघात हा उकाड्याशी संबंधित आजार आहे. ज्यामध्ये शरीराचे तापमान वाढते. लगेच उपचार न केल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे संभाव्य धोका विचारात घेऊन काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. तसेच आजारांवरील औषधांचा पुरेसा साठा रुग्णालयांत ठेवण्यास आरोग्य विभागाकडूनही सांगण्यात आले आहे.

सध्या शहर व जिल्ह्यामध्ये उष्माघाताचा अनेकांना त्रास होत असून ते खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. शासनाच्या क्लायमेट चेंज वेबसाईटवर उष्माघाताच्या रुग्णांची नोंद करणे आवश्यक असताना ती केली जात नाही. त्यामुळे शहर व जिल्ह्यात नेमक्या कितीजणांना उष्माघाताचा त्रास होतो, हे स्पष्ट होत नाही.जास्त वेळ तीव्र सूर्यप्रकाशात राहिल्यामुळे शरीराचे तापमान खूप वाढल्यामुळे जी स्थिती निर्माण होते त्याला उष्माघात म्हणतात. मार्च ते जून महिन्यात जेव्हा उन्हाची तीव्रता अधिक असते. दिवसाच्या साधारण ११ ते ४ या वेळात जास्त ऊन लागले तर होणारे परिणाम गंभीर असतात.

अधिक काळ उन्हाशी संपर्क आल्यामुळे शरीराचे तापमान खूप वाढते, म्हणजे ४० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षाही जास्त होते.डोकेदुखी, त्वचा कोरडी पडणे, लघवी कमी प्रमाणात येणे, पिवळी लघवी येणे, शरीरावर लाल चट्टे उठणे, हात, पाय आणि टाचांना सूज येणे, स्नायू दुखणे, चक्कर येणे, डोळ्यांची आग होणे, मनाची स्थिती बिघडणे, गोंधळ होणे, असंबंध बडबड करणे, चिडचिड करणे, जीभ जड होणे, चक्कर येणे, थकवा येणे, खूप जास्त घाम येणे, पायात गोळे येणे, डोकं खूप दुखणे, मळमळ व उलटी होणे या प्रकारचा त्रास उन्हामुळे होतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR