33.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeसोलापूरसोलापूर लोकसभा; भाजप प्रदेश सरचिटणीस मोहोळ, आ. गाडगीळ यांची पदाधिकाऱ्यांशी चर्चा

सोलापूर लोकसभा; भाजप प्रदेश सरचिटणीस मोहोळ, आ. गाडगीळ यांची पदाधिकाऱ्यांशी चर्चा

सोलापूर : सोलापूर लोकसभेसाठी उमेदवार कोण असावा, याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये सध्या चर्चा घड़त आहे. या पार्श्वभूमीवर कोण उमेदवार असावा, कोणाला अधिक पसंती आहे, याबाबत निरीक्षकांनी भाजपचे पदाधिकारी, विविध आघाड्या, सेल पदाधिकारी, विधानसभा, लोकसभेच्या प्रभारींकडून कल जाणून घेतला. सोलापूर व माढा लोकसभेसाठी निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. सोलापूरसाठी भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, आ. सुधीर गाडगीळ यांची निवड केली. त्यांनी १२० भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून लोकसभेच्या संभव्य उमेदवाराबाबत चाचपणी केली. त्यांच्याकडून कल जाणून घेतला. शिवाय जनतेच्या मनात कोण उमेदवार आहे, ही बाजू त्यांनी जाणून घेतली. भाजपने सोलापुरात दोन वेगवेगळे प्रयोग करून बघितले. त्यात दोन्ही वेळेला त्यांना यश मिळाले. यंदा उमेदवार कोण, हा पेच नेहमीप्रमाणे पडला आहे. खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांना पुन्हा संधी मिळेल का, हा प्रश्न उपस्थित होताना त्यांच्या जातीच्या दाखल्याचे संकटही पुढे ‘आ’ वासून उभे राहते,

माजी खा. अ‍ॅड. शरद बनसोडे यांची वर्णी लागणार का,अशीही चर्चा रंगत आहे. या पार्श्वभूमीवर माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांच्याही नावाची चर्चा झाली आणि थांबलीही, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांप्रमाणे भाजपमधील हौशी ‘भावी खासदार’ अशी पोस्ट सोशल मीडियावर झळकवत आहेत. काही जणांनी तर स्थानिक आणि अनुसूचित जातीचा खरा दाखला असलेल्या उमेदवाराला संधी द्या, अशी मागणीही केली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठी कोणाला लोकसभेचे बाशिंग बांधतील, हे अद्याप अस्पष्टच आहे. या सगळ्या विषयांवर पक्ष निरीक्षकांनी पदाधिकाऱ्यांकडून मते जाणून घेत मतदारसंघातील मानसिकतेचाही कानोसा घेतला. याचा आहवाल पक्षाच्या कोअर कमिटीसमोर ठेवल्यानंतरच उमेदवार जाहीर होईल, तोपर्यंत फक्त नावांच्या चर्चेचे गुर्‍हाळच रंगणार आहे.

शहर मध्य मतदारसंघ तेवढाच सध्या कॉग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे.बाकीच्या मतदारसंघांत भाजपने कॉग्रेसला सुरंग लावून भुईसपाट केले आहे. आमदार प्रणिती शिंदे सध्या तरी भाजपमध्ये जाण्यासाठी नाही म्हणत आहेत. मात्र, माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवाचा कलंक, शिक्का घेऊन राजकारणातून निवृत्त व्हायचे नाही. यासाठी त्या किंवा स्वतः सुशीलकुमार शिंदे विजयाचा गुलाल उधळण्यासाठी तयार आहेत. भविष्यात त्यांचा भाजप प्रवेश निश्चित असावा, असाही मतप्रवाह सध्या सुरू आहे.

सोलापुरात येताना ज्या भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधायचा आहे, त्या १२० जणांची यादी निरीक्षकांनीच काढली होती. शहराध्यक्ष नरेंद्र काळे, लोकसभेचे प्रमुख विक्रम देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. निरीक्षक आणि पदाधिकान्यांमध्ये ही चर्चा वन टू वन’च झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR