‘हनिमून कोच’ची इंटरनेटवर जोरदार चर्चा; रेल्वेची कडक कारवाई

जालना : प्रतिनिधी
भारतीय रेल्वेच्या ‘नंदिग्राम एक्स्प्रेस’मधील फर्स्ट एसी कोचचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रेल्वेचा डबा एखाद्या ‘हनिमून सूट’सारखा गुलाबाच्या फुलांनी आणि फुग्यांनी सजवलेला दिसत आहे. रेल्वे प्रशासनाकडून घटनेची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून या प्रकरणी एका कर्मचा-याला निलंबित करण्यात आले आहे. तसेच सजावट करणा-या व्यक्तीविरुद्ध रेल्वे डब्यात अनाधिकृतपणे प्रवेश आणि विना तिकीट प्रवास केल्याचा ठपका ठेवत रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यार ते चांगलेच तापले आहे.

नांदेड वरून मुंबईकडे जाणा-या नंदिग्राम एक्सप्रेसमधल्या फर्स्ट एसीच्या डब्यात एका दाम्पत्याने ६ जुलै २०२६ रोजी त्यांचा रेल्वे प्रवास खास बनवण्यासाठी फर्स्ट एसी कोचची सजावट करण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी ‘राहत रूम डेकोरेशन’ या खासगी डेकोरेटरला ऑनलाइन बुक केले होते. हे जोडपे छत्रपती संभाजीनगरहून कारने जालना रेल्वे स्थानकावर पोहोचले. मात्र, ते ट्रेनमध्ये बसण्यापूर्वीच या डेकोरेटरने जालना स्थानकावर डब्यात अनधिकृतपणे प्रवेश केला.

डेकोरेटरने संपूर्ण कोच लाल-पांढरे फुगे, हृदयाच्या आकाराचे शोभेचे साहित्य, गुलाबाच्या पाकळ्या आणि अप्पर बर्थवर “I Love You” असा संदेश लावून सजवला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फर्स्ट एसीमधील सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. दक्षिण मध्य रेल्वेने एक्स वर निवेदन जारी करत या प्रकरणावर तातडीने कारवाई केली.

रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, डेकोरेटरचा कोचमधील प्रवेश पूर्णपणे अनधिकृत होता आणि ही एक अत्यंत गंभीर सुरक्षा त्रुटीआहे. या हलगर्जीपणाबद्दल ड्युटीवर असलेले मुख्य तिकीट निरीक्षक गिरीश कुमार यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. तसेच, त्यांची सविस्तर विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. रेल्वेच्या सुरक्षित परिसरात अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी संबंधित डेकोरेटरवर ‘रेल्वे कायद्यांतर्गत’ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, आरक्षित एसी डब्यांमध्ये केवळ वैध तिकीट असलेले प्रवासी आणि अधिकृत रेल्वे कर्मचारी यांनाच प्रवेशाची परवानगी असते. कोणत्याही बाहेरील व्यक्तीला (खासगी डेकोरेटरसारख्या) अधिकृत परवानगीशिवाय कोचमध्ये प्रवेश देणे, हे सुरक्षेचे मोठे उल्लंघन मानले जाते. यामुळे प्रवाशांची आणि त्यांच्या सामानाची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते.

सोशल मीडियावर तीव्र संताप
या व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्सनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. काही लोकांनी याला कल्पक म्हटले असले तरी, बहुतांश लोकांनी रेल्वेच्या सुरक्षेवर आणि जोडप्याच्या नागरी कर्तव्यावर बोट ठेवले आहे. एका युजरने संताप व्यक्त करत लिहिले की, भारतीयांचा मूर्खपणा शिखरावर आहे. ट्रेन ही सार्वजनिक मालमत्ता आहे आणि लोकांमध्ये अजिबात सिव्हिक सेन्स उरलेला नाही. या जोडप्यावर आणि डेकोरेटरवर दंडात्मक कारवाई झालीच पाहिजे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये नव्या पुलाचा भाग अचानक कोसळला; मोठी दुर्घटना टळली!
03:36
Video thumbnail
Latur|लातुरात भूकंपाचे धक्के; प्रशासन अलर्ट मोडवर!
02:55
Video thumbnail
Latur| अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण; MIDC पोलिसांच्या केले स्वाधीन!
01:30
Video thumbnail
Latur Earthquake Tremors|मराठवाडा पुन्हा हादरला! मध्यरात्री सलग ४ भूकंपाचे धक्के
01:36
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
46:16
Video thumbnail
Latur|लातूर मनपाच्या स्थायी समिती बैठकीत फाईल गहाळ प्रकरणावर मोठा गदारोळ!
02:27
Video thumbnail
Latur|वासनगाव–गंगापूर रस्त्याची अखेर तातडीने दुरुस्ती सुरू!
01:50
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
00:00
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
09:33
Video thumbnail
Solapur|अक्कलकोटमध्ये पावसाची दडी; खरीप पेरण्या पूर्णपणे रखडल्या!
01:56
Video thumbnail
Latur|औसा अतिक्रमणाच्या विळख्यात; नगरपरिषदेला नागरिकांचा घेराव!
03:45
Video thumbnail
Latur|लातूरच्या इतिहासात पहिल्यांदाच! बुद्ध विहाराला 'क' दर्जाचे तीर्थक्षेत्र
03:17
Video thumbnail
Latur|४०वर्षे विकासाचा वनवास; नागरिकांचा संताप अनावर!प्रबुद्धनगर, महादेवनगर, कॉलनीची दयनीय अवस्था
03:42
Video thumbnail
Parbhani|परभणीत भरदिवसा जीवघेणा हल्ला;साक्ष न देण्याच्या वादातून भरदिवसा रक्तरंजित हल्ला!
03:31
Video thumbnail
Latur|शाळकरी विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली
02:53

Latest news