‘देख लुंगा’ भाषेवरून विरोधक आक्रमक

मुंबई : प्रतिनिधी
पावसाळी अधिवेशनात पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ला पडलेले खड्डे आणि पावसातील पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. यावर बोलताना काल (गुरुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना उद्देशून ‘भाडे के टट्टू’, ‘देख लुंगा..’ अशा शब्दांत खिल्ली उडवली. फडणवीस यांच्या या टीकेवरून आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियासह विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकच्या उद्घाटन सोहळ्यानंतर पहिल्याच पावसात मिसिंग लिंकच्या तोंडावर दरड कोसळल्यामुळे विरोधी पक्षांकडून भाजप सरकारवर टीका होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका करणा-यांना थेट ज्यांना कुत्रे विचारत नाही, ते सोशल मीडियावर पैसे घेऊन टीका करतात, त्यांना आता ‘देख लुंगा’ अशी भाषा वापरली. त्यांच्या या टीकेवर अंजली दमानिया यांनीदेखील पलटवार केला आहे. फडणवीसांच्या वक्तव्यावरून अहंकार, फक्त आणि फक्त अहंकार दिसत असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्राला संस्कारी मुख्यमंत्र्यांची गरज : राऊत
शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी एक्स (ट्विटर) वर पोस्ट करत मुख्यमंत्र्यांवर घणाघात केला. राऊत म्हणाले, वैफल्य, अहंकार, माज वगैरे वगैरे.. हे सर्व क्षणात उतरेल! महाराष्ट्राला संस्कारी मुख्यमंत्र्यांची गरज आहे! पण काय करणार? खाण तशी माती! देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात आणीबाणी लागू केली आहे काय? सरकार पुरस्कृत भ्रष्टाचार, लूटमार, झुंडबाजीवर जनतेने बोलायचे नाही ही आणीबाणीच आहे! असे राऊत म्हणाले.

बिनकामाचे सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही : यशोमती ठाकूर
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषेचा समाचार घेताना म्हटले की, ज्यांनी आयुष्यभर भाडोत्री लोक वापरून दुस-यांवर टीका केली, त्यांना आज स्वत:वर होणारी उत्स्फूर्त टीकाही भाडोत्री वाटते. ‘लोकशाहीत टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही नुकतेच सरकारला फटकारले आहे. मोठ्या पदावर बसलेल्या नेत्यांनी जनतेच्या टीकेला खिलाडूवृत्तीने घेऊन कामात सुधारणा करायची असते. विधान भवनातून अशा धमक्या द्यायच्या नसतात.’ बॉडी लँग्वेज सांगत आहे, मिसिंग लिंकचा दणका जोरात बसलाय! हे ‘बिनकामाचं सरकार’ म्हणजे महाराष्ट्र नाही… आणि फडणवीस म्हणजे महाराष्ट्र तर अजिबातच नाही, असा टोला ठाकूर यांनी लगावला.

विरोधकांनी प्रश्न मांडणे म्हणजे मुख्यमंत्र्यांची बदनामी नव्हे : विजय वडेट्टीवार
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संविधानात्मक चौकटीची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला. महाराष्ट्र हा १४ कोटी जनतेचा स्वाभिमानी प्रदेश आहे. रस्ते, भ्रष्टाचार, विकासातील उणिवा किंवा जनतेचे प्रश्न मांडणे ही विरोधी पक्षाची घटनात्मक भूमिका आहे. विरोधकांनी जनहिताचे प्रश्न मांडणे म्हणजे मुख्यमंत्र्यांची बदनामी नव्हे. मुख्यमंत्र्यांनी टीका वैयक्तिक न घेता जनतेच्या प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.

फडणवीस आज ‘देख लुंगा’ म्हणतात : अंजली दमानिया
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही मुख्यमंत्र्यांच्या अहंकारावर बोट ठेवले. ‘फक्त आणि फक्त अहंकार… मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्र पाहत असताना, सगळ्यांना ‘भाडे के टट्टू’ म्हणणे एका मुख्यमंत्र्यांना शोभते का? प्रत्येक प्रोजेक्टमध्ये अफाट भ्रष्टाचार होत असताना आवाज उठवला तर मुख्यमंत्री म्हणतात ‘देख लुंगा’? हेच फडणवीस कोणे एके काळी भ्रष्टाचाराचे मुद्दे अधिवेशनात मांडायचे आणि आज असे बोलत आहेत, अशी खंत दमानिया यांनी व्यक्त केली.

हुकूमशाहीकडे वाटचाल : बाळासाहेब थोरात
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही पावसाळी अधिवेशनातील कामकाजावर आणि सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले.
अध्यक्षांची भूमिका : विधानसभेचे आणि विधान परिषदेचे अध्यक्ष आता सत्ताधा-यांच्या इशा-यावर काम करत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. लोकशाहीत समर्थ विरोधी पक्ष असणे महत्त्वाचे असते. आपण हुकूमशाहीकडे चाललो आहोत. जगात माध्यम स्वातंत्र्यात भारताचा क्रमांक १५६ वा आहे, ही चांगली गोष्ट नाही.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|FDA च्या कारवाईला न जुमानता सील तोडली; बेकरी मालकावर गुन्हा!
02:07
Video thumbnail
Latur|टँकरने पाणी विकत घेऊन पिके जगवण्याची वेळ; बळीराजावर दुहेरी संकट
04:55
Video thumbnail
ट्रकच्या जोरदार धडकेत व्यक्ती गंभीर जखमी; सिग्नल व्यवस्था बंद असल्याने नागरिकांचा संताप
01:07
Video thumbnail
BIG BREAKING : PDCC निवडणुकीत नंदकुमार डाखोरे यांचा दणदणीत विजय!
05:11
Video thumbnail
Latur|लातूर सायबर पोलिसांची धडक कारवाई; ₹1.30 कोटींचे म्युल अकाउंट रॅकेट उघड
03:59
Video thumbnail
Latur|राज्य क्रीडा स्पर्धा आयोजनात लातूरची पाटी कोरी, क्रीडा प्रेमी आणि खेळाडूंमध्ये तीव्र नाराजी.
04:05
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये कलावंतांचा अनोखा संघर्ष; सूर आणि तालातून न्यायाची हाक
03:09
Video thumbnail
Big Breaking : पिस्तुल्या महाराजाच्या दीड कोटींच्या बंगल्यावर जप्तीची तयारी!
02:12
Video thumbnail
Latur Protest|सोनम वांगचूक प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद; गांधी चौकात घोषणाबाजी
06:07
Video thumbnail
Parbhani|राहुल पाटील यांना सईद खानांचे थेट आव्हान; परभणीचे राजकारण तापले
03:39
Video thumbnail
EXCLUSIVE : पाऊस गायब... पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जीवघेणा संघर्ष!
02:20
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38

Latest news