36.9 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रहातकणंगलेत गोंधळ, दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

हातकणंगलेत गोंधळ, दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

मतदान काही काळासाठी थांबवले

हातकणंगले : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात वाळवा तालुक्यातील साखराळे गावात मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांच्या कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाला. यामुळे मतदान काही काळासाठी थांबवावे लागले. पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांची समजूत काढली. त्यानंतर पुन्हा मतदान सुरू झाले.

वाळवा तालुक्यातील साखराळे गावातील बुथ क्रमांक ६२ आणि ६३ वर हा प्रकार घडला आहे. महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि महाविकास आघाडीचे उबाठा गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांच्या गटात जोरात बाचाबाची झाली. त्याचे रुपांतर जोरदार हाणामारीत झाले. मतदान केंद्र क्रमांक ६२ आणि ६३ वर सत्यजित पाटील सरूडकर यांचे बोगस प्रतिनिधी आहेत.

त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करत धैर्यशील माने यांच्या गटाने मतदान केंद्र काही काळ बंद ठेवले होते. यावरून सत्यजित पाटील सरूडकर यांचे कार्यकर्ते आक्रमक होऊन जाब विचारण्यासाठी आले. दोन्ही गटांत शाब्दिक वादावादी होऊन जोरदार हाणामारी झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR