35.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूर१००१ महिलांकडून श्री सिद्धेश्वरांना महारुद्राभिषेक

१००१ महिलांकडून श्री सिद्धेश्वरांना महारुद्राभिषेक

लातूर : प्रतिनिधी
लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थान यात्रा महोत्सव उत्साहात साजरा होत आहे. यात्रा महोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम घेतले जात आहेत. दि. १६ मार्च रोजी सकाळी शहरातील १००१ महिलांंकडून श्री सिद्धेश्वरांना महारुद्राभिषेक करण्यात आला.

शहरातील १००१ महिलांनी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरास महारुद्राभिषेक केल्यानंतर महिलांसाठी विविध स्पर्धाही संपन्न झाल्या. शहरातील महिलांकडून दरवर्षी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरास महारुद्राभिषेक करण्याची परंपरा आहे.यावर्षीही ही परंपरा जपत १००१ महिलांनी ग्रामदैवताला रुद्राभिषेक केला.सकाळी ९ वाजता या रुद्राभिषेकास प्रारंभ झाला.अभिषेक संपन्न झाल्यानंतर महारुद्र पठणही करण्यात आले. महिलांसाठी विविध स्पर्धा मंदिरात घेण्यात आल्या. यात रताळ्यापासून गोड पदार्थ बनविणे, कडधान्यापासून तिखट पदार्थ तयार करणे यासह विविध स्पर्धा प्रकारांचा समावेश होता. या सर्व स्पर्धातील विजेत्या महिलांना लगेचच पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

स्पर्धांचे परीक्षक म्हणून नीता अग्रवाल व शीला यादव यांनी काम पाहिले. महारुद्राभिषेक व विविध स्पर्धांमध्ये हजारो महिलांनी सहभाग नोंदवला. महारुद्राभिषेक व विविध स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी शुभदा रेड्डी, सुखदा मांडे व स्मिता गोजमगुंडे यांच्यासह महिलांनी परिश्रम घेतले. उपस्थित सर्वांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR