रेणापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील डिघोळ देशमुख येथे गुरुवारी (दि. १९) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास विजेच्या शॉर्टसर्किटमुळे ऊसाला आग लागल्याने. या आगीत गावातील तब्बल १५ शेतक-यांचे ऊस जळून खाक झाले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ऐन गाळप हंगामात हाताशी आलेले ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने शेतक-यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
या आगीत शोभा सिताराम साळवे यांचा ४ एकर, बालासाहेब सदाशिव इंगळे यांचा १.५ एकर, रामराजे सदाशिव इंगळे यांचा १ एकर, नजीर राजेखाँ पठाण यांचा ५ एकर, विजयमाला मच्छींद्र घोगरे यांचा ४ एकर, जयाबाई दीपक जोगी यांचा ४ एकर, प्रकाश काशिनाथ जोगी यांचा ४ एकर, चांदपाशा राजेखाँ पठाण यांचा २.५ एकर, मुस्तफा राजेखाँ पठाण यांचा १.५ एकर, हनिफा नजीर पठाण यांचे ३० गुंठे, नारायण भाऊराव पवार यांचा १.५ एकर, ओमप्रकाश रामकिसन जोशी यांचा १.५ एकर तसेच भागवत ज्ञानोबा शिंदे, पांडुरंग ज्ञानोबा शिंदे आणि कांताबाई ज्ञानोबा शिंदे यांच्या ऊस पिकाचे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच रेणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक तानाजी कांबळे ,डॉ. उमाकांत देशमुख ,बालाजी हाके,यांनी कारखाना प्रशासनाला माहिती देऊन संचालक व कारखाना प्रशासनाने घटनास्थळी भेट देवून शेतक-यांना धिर देत माजी मंत्री तथा सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख आणि माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार आगीत जळालेल्या उसाची उद्यापासून तोडणी करण्यात येणार आहे मात्र, आगीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने तातडीने द्यावी, अशी मागणी शेतक-यांकडून होत आहे.
















