31.6 C
Latur
Friday, May 9, 2025
Homeराष्ट्रीय२०३५ पर्यंत अंतराळ स्थानक उभारणार

२०३५ पर्यंत अंतराळ स्थानक उभारणार

गांधीनगर : प्रतिनिधी
चांद्रयान ३ च्या यशस्वीतेनंतर भारत आता अंतराळात अंतराळवीर पाठवण्याच्या तयारीत आहे. त्यादृष्टीने तयारीही सुरू झाली आहे. दरम्यान, आपण अंतराळात लवकरच अंतराळवीर पाठवणार आहोत, असे इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषदेत सांगितले. यादरम्यान, त्यांनी अंतराळ कार्यक्रमासाठी भारताची महत्त्वाकांक्षी दृष्टी अधोरेखित केली. ते म्हणाले की, पंतप्रधान नेहमीच अंतराळासाठी मदत करतात. ते गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून त्यांचे सहकार्य लाभले आहे. गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या या परिषदेत बोलताना त्यांनी २०३५ पर्यंत अंतराळात भारतीय अंतराळ स्थानक उभारण्याचे उद्दिष्टही अधोरेखित केले.

चांद्रयानचे यश आणि इस्रोचे मागील ६ महिन्यांतील सर्व प्रयत्न लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींनी आमच्यासाठी एक विशेष योजना तयार केली आहे. त्यामुळे इस्रोच्या सध्याच्या प्रकल्पात यश मिळवण्यास मदत होणार आहे. एस. सोमनाथ पुढे म्हणाले की, इस्रोचे उद्दिष्ट केवळ गगनयान मोहीम राबविणे नाही तर अंतराळात मानवी कार्य प्रस्थापित करणेदेखील आहे. जेणेकरून २०४० पर्यंत भारतीय अंतराळवीर चंद्रावर पाऊल ठेवू शकेल. २०४० पर्यंतचा हा कालावधी फार मोठा वाटत असला तरीही तो प्रत्यक्षात फार मोठा नाही. २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक तयार करण्याचे आपले उद्दिष्ट आहे. यामुळे भारतीयांना सूक्ष्म गुरुत्वाकर्षण परिस्थितीत संशोधन करण्यासाठी व्यासपीठ म्हणून काम करेल.

यावर्षी गगनयानाची चाचणी
भारतीय अंतराळ संस्था गगनयान मोहिमेची तयारी करत आहे. २०२५ पर्यंत या गगनयानाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे, त्यासाठी २०२४ मध्ये प्रक्षेपणाची चाचणी घेण्यात येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR