33.5 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्र३१ मेपर्यंत सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित

३१ मेपर्यंत सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित

पुणे, प्रतिनिधी – देशभर सध्या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे येत्या ३१ मेपर्यंत राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत; परंतु ज्या सहकारी संस्थांची निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे अशा संस्थांमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड करता येणार आहे. या निर्णयाला शासकीय मान्यता देण्यात आली आहे.
याबाबतचे एक पत्र राज्य शासनाचे कक्ष अधिकारी अनिल चौधरी यांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या सचिवांना पाठविले आहे. याबाबत निवडणूक प्राधिकरणाने राज्य शासनाकडे विचारणा केली होती. त्यानंतर शासनाच्या वतीने खुलासा वजा पत्र पाठविण्यात आले आहे. राज्यातील सहकारी संस्थाची जी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे ती तूर्त स्थगित करण्यात आली आहे.
उपलब्ध महितीनुसार राज्यात ३१ डिसेंबरअखेर ९३ हजार ३४२ सहकारी संस्थांपैकी ५० हजार २३८ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अजून राज्यात २० हजार १३० संस्थांची निवडणूक प्रक्रिया प्रलंबित आहे. चालू वर्षात ७,८२७ सहकारी संस्था निवडणुकीसाठी पात्र असणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR