७ जुलै रोजी नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटी?

मुंबई : प्रतिनिधी
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरासाठी अत्यंत चिंतेची आणि मोठी बातमी समोर येत आहे. उद्या या भागात तीव्र ढगफुटी होण्याची दाट शक्यता असून, एकाच दिवसात तब्बल ३०० मिमी इतका विक्रमी पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: याबाबतची माहिती देत नाशिक जिल्ह्याला सर्वात महत्त्वाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकचे जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे अ‍ॅक्शन मोडवर आली आहे.

नाशिकमधील संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्या ७ जुलै रोजी सर्वात महत्त्वाचा अलर्ट नाशिकला आहे. नाशिक आणि र्त्यंबकेश्वर दरम्यानच्या भागात उद्या ढगफुटी संभावित आहे. त्या प्रकारचे निर्देश आपल्याला प्राप्त झालेले आहेत. ही मोठी ढगफुटी असू शकते, जवळपास ३०० मिमी पाऊस ढगफुटीमुळे या भागात होऊ शकतो.

नाशिकच्या ब-याच मोठ्या भागात ढगफुटी होऊ शकते, त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी केलेली आहे. नाशिक शहर किंवा नाशिक जिल्हा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे ढगफुटीमुळे जी परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्याची पडताळणी करून ब-याचशा उपायोजना करण्यात आलेल्या आहेत. यावर आपल्याला अतिशय करडी नजर ठेवावी लागणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

दरम्यान, नाशिक जिल्हा परिषद आणि स्थानिक यंत्रणा सतर्क झाली आहे. नाशिकच्या घाटमाथा परिसरात पावसाचा ‘रेड अलर्ट’ असल्याने काही तातडीचे निर्णय घेण्यात आले आहेत. नाशिकच्या ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने शाळांना सुटी देण्याचा निर्णय स्थानिक परिस्थिती पाहून घेण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी दिल्या आहेत. ग्रामीण भागात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांना २४ तास अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग्रामीण भागात किंवा नदीकाठच्या गावांमध्ये पूरपरिस्थिती अथवा दरड कोसळण्यासारखी कोणतीही दुर्घटना घडल्यास, त्याची माहिती तात्काळ जिल्हा प्रशासनाला देण्याचे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी केले आहे.

अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट
कोकण आणि मुंबई: प्रादेशिक हवामान केंद्राने आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

पुणे जिल्ह्यात शाळांना सुटी
पुणे जिल्ह्यासाठीही हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ दिला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे, तर पुणे शहरातील शाळांना महापौर मंजूषा नागपुरे यांनी सुट्टी दिली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE-लातुरात आज आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात एल्गार!
00:00
Video thumbnail
Latur|उपवर्गीकरणाविरोधात ५८ जाती एकवटल्या; लातूरमध्ये ऐतिहासिक मोर्चा
02:01
Video thumbnail
Latur|रेणापूर तहसील कार्यालयासमोर संभाजी सेनेचे आंदोलन
01:25
Video thumbnail
LIVE-लातुरात आज आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात एल्गार!
02:41
Video thumbnail
Latur|फुटबॉलसाठी लातूर सज्ज... सुरू झाली आंतरराष्ट्रीय मैदानांची उभारणी!
03:59
Video thumbnail
LIVE-लातुरात आज आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात एल्गार!
06:53
Video thumbnail
Latur|शेतात जाण्यासाठी रस्ताच नाही; न्यायासाठी आमरण उपोषण
01:51
Video thumbnail
Latur|लातुरात आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात आज महामोर्चा!
03:36
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये उबाठाचे रामरक्षा आंदोलन; दानप्रकरणावर संताप
02:44
Video thumbnail
Nanded|रेल्वे गाड्यांच्या उद्घाटनापूर्वी उबाठा पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या नोटिसा
01:10
Video thumbnail
'मिसिंग लिंक'वर पावसाचा फटका; दरड कोसळल्यानंतर ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
00:41
Video thumbnail
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने केली तिसरी लग्नगाठ; गौरी स्प्रॅटसोबतच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल.
00:48
Video thumbnail
Hatta News|हट्टाकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली!;२.४० कोटींच्या नव्या बसस्थानकाचे भूमिपूजन
07:13
Video thumbnail
Latur Police Action|लातूर पोलिसांची धडाकेबाज ॲक्शन; आरोपींची गंजगोलाईत धिंड
02:08
Video thumbnail
Latur|जिल्हा परिषदेत पहिली वार्षिक सभा; राजकीय हालचालींना वेग
04:26

Latest news