चार वर्षांत १११ खासदार-आमदारांनी बदलला पक्ष

नवी दिल्ली : निवडणुकीनंतर मतदारांनी निर्माण केलेले राजकीय समीकरण पक्षांतरामुळे बदलत असल्याचे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर)च्या अहवालातून समोर आले आहे. २०२२ ते २०२६ या कालावधीत देशातील १११ खासदार आणि आमदारांनी आपला पक्ष बदलला. यामध्ये २६ लोकसभा खासदार, ७ राज्यसभा खासदार आणि ७८ आमदारांचा समावेश आहे. एडीआरने २०२२ ते २०२६ दरम्यान झालेल्या निवडणुका आणि पोटनिवडणुकांच्या आधारे हे विश्लेषण केले आहे.

अहवालानुसार, पक्ष बदललेल्या ७८ आमदारांपैकी ७० आमदारांनी निवडणूक जिंकल्यानंतर थेट पक्ष बदलला. तर ८ आमदारांनी राजीनामा किंवा अपात्रतेसारख्या प्रक्रियेनंतर पोटनिवडणूक लढवून पुन्हा विजय मिळवल्यानंतर पक्ष बदलला. पक्षांतराची प्रकरणे १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आढळली. नागालँडमध्ये सर्वाधिक ३२ लोकप्रतिनिधींनी पक्ष बदलला. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये २०, तेलंगणात ९, गोवा आणि पंजाबमध्ये प्रत्येकी ८, महाराष्ट्र आणि मेघालयमध्ये प्रत्येकी ६, तर मणिपूरमध्ये ५ लोकप्रतिनिधींनी पक्ष बदलला. नागालँड आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांमध्ये मिळून एकूण पक्षांतराच्या जवळपास ४७ टक्के घटना झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. पक्षांतरामुळे सर्वाधिक नुकसान एनडीपीपीचे झाले. या पक्षाच्या २५ निवडून आलेल्या प्रतिनिधींनी पक्ष सोडला. हे एकूण पक्षांतराच्या सुमारे २३ टक्के आहे. त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या २० आणि काँग्रेसच्या १९ लोकप्रतिनिधींनी पक्ष बदलला. बीआरएसच्या ९, एएपी आणि एनसीपीच्या प्रत्येकी ७, शिवसेना (यूबीटी)च्या ६, जेडी(यू)च्या ५ आणि एनपीपीच्या ४ लोकप्रतिनिधींनी पक्ष बदलल्याचे अहवालात नमूद आहे. एनडीपीपी, एआयटीसी आणि काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या लोकप्रतिनिधींची संख्या मिळून ६४ झाली. हे एकूण पक्षांतराच्या सुमारे ५८ टक्के आहे.

एनपीएफ आणि भाजपकडे सर्वाधिक नेते
पक्ष बदललेल्या नेत्यांची सर्वाधिक पसंती ठढऋला मिळाली. या पक्षात ३२ नेते दाखल झाले. त्यानंतर भाजपमध्ये २९ आणि एनसीपीआय २० नेते गेले. काँग्रेसमध्ये ९, शिवसेनेत ८, एनपीपीमध्ये ६ आणि पीपीएमध्ये ४ नेते दाखल झाले. एनपीएफ भाजप आणि नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया या तीन पक्षांमध्ये मिळून १११ पैकी ८१ नेते दाखल झाले. हे एकूण पक्षांतराच्या ७३ टक्के आहे.

नागालँडपासून महाराष्ट्रापर्यंते बदल
एडीआरच्या अहवालानुसार, काही राज्यांमध्ये सरकार पडणे किंवा राजकीय परिस्थिती बदलण्यामागे आमदारांचे पक्षांतर हे महत्त्वाचे कारण ठरले आहे. नागालँडमध्ये ३२ लोकप्रतिनिधींनी पक्ष बदलल्याने तेथील राजकीय समीकरणांमध्ये बदल झाला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमधून २० लोकप्रतिनिधी बाहेर पडल्याने तेथील विरोधी राजकारणाच्या समीकरणावर परिणाम झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तेलंगणात बीआरएसच्या ९ आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने विधानसभा पातळीवर बीआरएसची संख्या कमी झाली आणि काँग्रेसची स्थिती मजबूत झाली. गोव्यात काँग्रेसच्या ८ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मणिपूरमध्ये ५ आमदारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात शिवसेनाच्या ६ खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. अहवालानुसार, निवडणुकीच्या वेळी मतदारांनी निर्माण केलेले राजकीय चित्र नंतरच्या पक्षांतरामुळे अनेक राज्यांमध्ये बदलले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातुरात झाडातून अवतरले गणराय; अनोख्या देखाव्याने वेधलं लक्ष!
04:37
Video thumbnail
🔴 LIVE - एकमत कार्यालयातील गणरायाची आरती |EKMAT DIGITAL
12:45
Video thumbnail
Latur| डुप्लिकेट आमदारांना सांभाळू नका; देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावर अभय साळुंके थेट बोलले
08:03
Video thumbnail
Latur|लातूर-तुळजापूर महामार्गावर राष्ट्रवादीचा रास्ता रोको
03:13
Video thumbnail
Latur|नानिकभाई जोधवानी यांच्या हस्ते एकमत कार्यालयातील गणरायाची आरती संपन्न
05:07
Video thumbnail
Latur|मोईजभाई शेख यांच्या आठवणींना काँग्रेस नेत्यांकडून उजाळा
05:40
Video thumbnail
Latur|लक्ष्मण ढोबळेंच्या वक्तव्याविरोधात महिलांचा संताप
02:00
Video thumbnail
Latur|महादेव उबाळे यांच्या हस्ते एकमत कार्यालयातील आरती संपन्न
08:58
Video thumbnail
🔴 LIVE - एकमत कार्यालयातील गणरायाची आरती |EKMAT DIGITAL
12:44
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये सफाई कामगारांचा ‘झाडू मोर्चा’; ईपीएफची रक्कम देण्याची मागणी
02:02
Video thumbnail
Latur|शासन निर्णयाची होळी! ग्रामरोजगार सहाय्यकांचा थेट इशारा
03:28
Video thumbnail
Latur|तुटपुंजी मदत नको! शेतकऱ्यांना भरीव मदतीची मागणी
06:34
Video thumbnail
Latur| देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर शेतकऱ्यांनी थेटच बोलले
10:40
Video thumbnail
CM Devendra Fadanvis|दोन दिवसांत जीआर! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा
05:52
Video thumbnail
🔴 LIVE मुख्यमंत्री फडणवीस आज लातूर दौऱ्यावर; शेतकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया| Ekmat Digital
12:19

Latest news