एकदिवसीय विश्वचषकासाठी १२ शहरांची निवड

जोहान्सबर्ग : आयसीसीने २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी १२ यजमान शहरांची घोषणा केली आहे. ही स्पर्धा ४ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये खेळवली जाईल.

दक्षिण आफ्रिकेतील ८ ठिकाणी सामने खेळवले जातील. यामध्ये जोहान्सबर्ग, सेंच्युरियन, डर्बन, ग्केबेर्हा, कुगोम्पो सिटी, केपटाऊन, पार्ल आणि ब्लोमफोंटेन ही शहरे असतील. तर झिम्बाब्वेतील हरारे, बुलावायो आणि व्हिक्टोरिया फॉल्स तसेच नामिबियाची राजधानी विंडहोक येथेही सामने खेळवले जातील. अंतिम सामना जोहान्सबर्गमधील वांडरर्स किंवा केपटाऊनमधील न्यूलँड्स स्टेडियममध्ये होऊ शकतो. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत यजमान भारताचा ६ गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले होते.

एकदिवसीय विश्वचषक २४ वर्षांनंतर आफ्रिकेत परत येत आहे. यापूर्वी २००३ मध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि केनियाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने २००७ टी-२० विश्वचषक, २००९ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२३ महिला टी-२० विश्वचषकाचे आयोजन केले आहे. नामिबिया पहिल्यांदाच कोणत्याही वरिष्ठ आयसीसी स्पर्धेचे आयोजन करणार आहे. मात्र, याच वर्षी त्याने झिम्बाब्वेसोबत मिळून अंडर-१९ विश्वचषकाचे आयोजन केले होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - धाराशिव
02:18:26
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत- सोलापूर
02:13:30
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35

Latest news