24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeअंतरराष्ट्रीयहमासचे १३० बोगदे नष्ट; इस्राईली सैन्याचा दावा

हमासचे १३० बोगदे नष्ट; इस्राईली सैन्याचा दावा

जेरुसलेम : हमसच्या हल्ल्यानंतर इस्राईलच्या संरक्षण दलांनीही मोठ्या प्रमाणावर भू-आक्रमणाची योजना आखली आहे. इस्राईल लष्कराचे रणगाडे, चिलखती वाहने आणि सैन्य गाझामध्ये जमिनीवर हल्ले करत आहेत. युनायटेड नेशन्ससह जगातील अनेक देश आणि एजन्सी युद्ध थांबवण्यासाठी आवाहन करत आहेत. मात्र, त्यांना अजूनही यश आले नाही. आता इस्रायली सैन्याने (आयडीएफ) दावा केला आहे की, गाझामध्ये जमिनीवर कारवाई सुरू झाल्यापासून हमासचे १३० बोगदे नष्ट करण्यात आले आहेत.

आयडीएफ लढाऊ अभियंते बोगद्यांसह गाझामधील हमासच्या पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी काम करत आहेत. आयडीएफने एका निवेदनात म्हटले आहे की, बोगद्यांमध्ये सापडलेले पाणी आणि ऑक्सिजनचे साठे हमासची दीर्घकाळ भूमिगत राहण्याची तयारी सिद्ध करतात. इस्रायली सैन्याने सांगितले की, त्यांनी उत्तर गाझामधील बीट हनान भागात यूएन शाळेजवळील हमासचा बोगदा नष्ट केला आहे. आयडीएफने एक व्हीडीओ जारी केला आहे. ज्यामध्ये शाळेजवळील कथित बोगदा” नष्ट करताना दाखवण्यात आले आहे. इस्राईलच्या हल्ल्यात गाझामधील १०,५६९ लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याचे हमासच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

तसेच इस्राईलने दावा केला होता की, १० तासांच्या दीर्घ संघर्षानंतर त्यांनी उत्तर गाझामधील हमासचा भूभाग ताब्यात घेतला आहे. आता हमासने इस्राईलच्या दाव्याला प्रत्युत्तर दिले आहे. हमासच्या लष्करी शाखा अल-कसामने दावा केला आहे की, त्यांनी बीच कॅम्पजवळ तीन इस्रायली वाहने आणि एक बुलडोझर नष्ट केला आहे. याशिवाय गाझा शहराच्या उत्तरेकडील भागात शेख रदवान येथे एक इस्रायली रणगाडा उद्ध्वस्त करण्यात आला आहे.

वाहनांवर बॉम्बफेक
पॅलेस्टाईन इस्लामिक जिहादच्या अल-कुद्स ब्रिगेडने गाझा शहरातील अन्सार कॉम्प्लेक्समध्ये इस्रायली वाहनांवर बॉम्बफेक केल्याचा दावा केला आहे. इस्राईलच्या अश्दोद शहरावर रॉकेट डागल्याचा दावाही त्यांनी केला. इस्राईलच्या या शहरात हवाई हल्ल्याचे सायरनही ऐकू आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR