जळगाव : जळगाव जिल्ह्यात आज सुन्न करणारी घटना घडली आहे. पारोळा तालुक्यातील बोळेगावचे गावकरी पिकअप गाडीमधून शिंदखेडच्या दिशेला जात होते. हे सर्व गावकरी अन्त्ययात्रेसाठी जात होते.
बोळेगावच्या या गावक-यांच्या गाडीला पारोळ्याकडून धुळेकडे जाणा-या एका कंटेनरने जोराची धडक दिली. त्यामुळे मोठा अपघात झाला. रस्त्यावर जखमींच्या रक्ताचा अक्षरश: सडा पडला. यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर २२ जण गंभीररीत्या जखमी झाले.
जळगावातील पारोळा येथील राष्ट्रीय महामार्ग ६ वरील वीजखेडे गावानजिक ट्रक आणि दोन पिकअप वाहनांच्या विचित्र अपघातात तीन महिला जागीच ठार झाल्या. तर २२ जण गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना आज घडली.
रेखाबाई गणेश कोळी (वय ५५), योगिता रवींद्र पाटील (वय ४० ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर चंदनबाई नाना गिरासे (वय ५०) या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेले जात असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला. तीनही महिला या पारोळा तालुक्यातील बोळेगावच्या राहिवासी आहेत. तर या अपघातात दोन्ही वाहनांमधील २२ जण जखमी झाले आहेत.