इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थ्याचा काही मिनिटांतच मृत्यू झाला. गर्दीने भरलेल्या वर्गात विद्यार्थी अचानक बेशुद्ध पडला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
कोचिंग क्लासमध्ये बसलेला विद्यार्थी बेंचवर पडला. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारण सायलेंट हार्ट अटॅक असल्याचे मानले जात असले तरी शवविच्छेदनानंतरच याची पुष्टी होईल.
सागर जिल्ह्यातील रहिवासी असलेला हा विद्यार्थी ब-याच दिवसांपासून इंदूरला येऊन एमपीपीएसईची तयारी करत होता. बुधवारी हा विद्यार्थी नेहमीप्रमाणे आपल्या वर्गात गेला होता. मात्र, वर्गात शिकत असताना अचानक तो बाकावर पडला.
महिनाभरापूर्वीही सायलेंट हार्ट अटॅकमुळे एका चित्रकाराचा मृत्यू झाला होता, त्यात चित्रकार अचानक बेशुद्ध पडला होता. आशिष मुन्नालाल सिंग असे त्याचे नाव आहे. तसेच १९ दिवसांपूर्वी बीए प्रथम वर्षाच्या एका १७ वर्षीय विद्यार्थिनीचा घरातच संशयास्पद मृत्यू झाला होता, त्यात विद्यार्थिनीला अचानक छातीत दुखणे व घाबरणे जाणवू लागले आणि तिचा मृत्यू झाल्यानंतर हा सायलेंट हार्ट अटॅकच असल्याचे सांगण्यात आले.