पाताळगंगा नदीत ३ हजार गॅस सिलिंडर गेले वाहून

रायगड : प्रतिनिधी
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्या दुथडी भरून वाहत असून, अनेक भाग जलमय झाले आहेत. या पावसादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा परिसरातून वाहणा-या पाताळगंगा नदीत शेकडो गॅस सिलिंडर वाहत जात असल्याचे धक्कादायक दृश्य समोर आले. सुरुवातीला हे सिलिंडर नेमके कुठून आले याबाबत संभ्रम होता. मात्र, आता याबाबत प्रशासनाने माहिती दिली असून, पनवेल तालुक्यातील चावणे येथील एचपीसीएलच्या एलपीजी बॉटलिंग प्लांटमधून अतिवृष्टीमुळे सुमारे ३ हजार गॅस सिलिंडर पाताळगंगा नदीत वाहून गेल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये भरलेले तसेच रिकामे अशा दोन्ही प्रकारचे सिलिंडर असल्याची माहिती आहे.

मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीला मोठा पूर
दरम्यान, नदीतून वाहत जाणारे सिलिंडर दोरीला हूक लावून बाहेर काढण्याचा प्रयत्न काही नागरिक करताना दिसून आले. रायगड जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीला मोठा पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात पनवेल तालुक्यातील चावणे येथील एचपीसीएल पाताळगंगा एलपीजी बॉटलिंग प्लांटमधील अंदाजे ३ हजार गॅस सिलिंडर वाहून गेले आहेत. यामध्ये काही सिलिंडर गॅस भरलेले तर काही रिकामे असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

सिलिंडर हाताळताना धोका पत्करू नये
पुराच्या प्रवाहासोबत हे सिलिंडर खारपाडा परिसरातून खाडीच्या दिशेने मोठ्या वेगाने वाहताना दिसले. या घटनेचे व्हीडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. काही नागरिकांनी नदीतून सिलिंडर बाहेर काढण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान, जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.

नदीतून किंवा परिसरात वाहून आलेले एचपीसीएलचे गॅस सिलिंडर कोणालाही सापडल्यास ते स्वत:कडे न ठेवता तात्काळ एचपीसीएल कंपनी, जवळच्या एचपीसीएल वितरक, तहसीलदार कार्यालय खालापूर, तहसीलदार कार्यालय पेण किंवा उपविभागीय अधिकारी, पेण यांच्या कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच नागरिकांनी अशा सिलिंडरची हाताळणी करताना कोणताही धोका पत्करू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE- लातूर जिल्हा परिषदेच्या काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या आशाताई भिसे यांची पत्रकार परिषद
00:00
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
37:07
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये नव्या पुलाचा भाग अचानक कोसळला; मोठी दुर्घटना टळली!
03:36
Video thumbnail
Latur|लातुरात भूकंपाचे धक्के; प्रशासन अलर्ट मोडवर!
02:55
Video thumbnail
Latur| अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण; MIDC पोलिसांच्या केले स्वाधीन!
01:30
Video thumbnail
Latur Earthquake Tremors|मराठवाडा पुन्हा हादरला! मध्यरात्री सलग ४ भूकंपाचे धक्के
01:36
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
46:16
Video thumbnail
Latur|लातूर मनपाच्या स्थायी समिती बैठकीत फाईल गहाळ प्रकरणावर मोठा गदारोळ!
02:27
Video thumbnail
Latur|वासनगाव–गंगापूर रस्त्याची अखेर तातडीने दुरुस्ती सुरू!
01:50
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
09:33
Video thumbnail
Solapur|अक्कलकोटमध्ये पावसाची दडी; खरीप पेरण्या पूर्णपणे रखडल्या!
01:56
Video thumbnail
Latur|औसा अतिक्रमणाच्या विळख्यात; नगरपरिषदेला नागरिकांचा घेराव!
03:45
Video thumbnail
Latur|लातूरच्या इतिहासात पहिल्यांदाच! बुद्ध विहाराला 'क' दर्जाचे तीर्थक्षेत्र
03:17
Video thumbnail
Latur|४०वर्षे विकासाचा वनवास; नागरिकांचा संताप अनावर!प्रबुद्धनगर, महादेवनगर, कॉलनीची दयनीय अवस्था
03:42
Video thumbnail
Parbhani|परभणीत भरदिवसा जीवघेणा हल्ला;साक्ष न देण्याच्या वादातून भरदिवसा रक्तरंजित हल्ला!
03:31

Latest news