24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयभाजपचे ३१ नेते घेणार मध्य प्रदेशात दररोज १२५ सभा

भाजपचे ३१ नेते घेणार मध्य प्रदेशात दररोज १२५ सभा

इंदूर : भाजप-काँग्रेसने आता प्रचाराच्या शेवटच्या फेरीत आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. भाजपमध्ये केंद्र आणि राज्यातील ३१ नेते प्रचारात गुंतले आहेत. प्रत्येक नेता दिवसाला पाच सभा आणि रोड शो करत आहे. अशा स्थितीत संपूर्ण राज्यात दररोज एकूण १२५ ते १५० रोड शो आणि सभांचे आयोजन करण्यात येत आहे. राज्यातील कोणत्या विधानसभा जागेवर प्रचारासाठी कोणता स्टार प्रचारक पाठवायचा, याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या आणि उमेदवारांच्या अभिप्रायानंतर घेतला जात आहे. या अभिप्रायासाठी भाजप खासगी एजन्सीची मदत घेत आहे.

एजन्सी कॉल सेंटरद्वारे संबंधित विधानसभेतील जनतेला प्रश्न विचारत आहे आणि त्याचा अहवाल वरिष्ठ नेत्यांना दिला जात आहे. कॉल सेंटरवरून, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना त्यांच्या जागी प्रचाराची स्थिती काय आहे, हे फोनवरून विचारले जाते. कोणता स्टार प्रचारक पाठवून वातावरणनिर्मिती करणार, असा प्रश्न कार्यकर्त्यांना विचारला जात आहे. दुसरीकडे, काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाचे सरचिटणीस प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह ३३ हून अधिक नेत्यांच्या सभा आणि रोड शो आयोजित करण्यात आले आहेत. कमलनाथ सर्वाधिक सभा घेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR