38.2 C
Latur
Sunday, May 4, 2025
Homeराष्ट्रीयबस, जीप आणि दुचाकीच्या धडकेत ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू

बस, जीप आणि दुचाकीच्या धडकेत ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू

साबरकांठा : गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यातून एका भीषण रस्ते अपघाताची बातमी आली आहे. साबरकांठा येथे जीप, बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत ६ जणांचा मृत्यू झाला. साबरकांठा येथे एक जीप, राज्य परिवहन बस आणि एका दुचाकीची जोरदार धडक झाली. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मृतांमध्ये एका लहान मुलीचा देखील समावेश आहे. शनिवारी हा भीषण अपघात हिंगाटिया गावाजवळील राज्य महामार्गावर घडला. जीप आणि बसच्या धडकेनंतर एका दुचाकीने मागून जीपला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवर तीन जण होते. मृतांपैकी बहुतेक लोक जीपमधून प्रवास करत होते. धडकेनंतर जीपचे तुकडे झाले. जखमींवर जिल्हा मुख्यालय हिम्मतनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांपैकी बहुतेक जण साबरकांठा जिल्ह्यातील पुरुष होते.

अपघाताच्या वेळी, राज्य परिवहन महामंडळाची बस बनासकांठा जिल्ह्यातील अंबाजी येथून वडोदरा येथे जात होती. तर जीप समोरून येत होती. यावेळी तीन दुचाकीस्वारही जीपच्या मागून येत होते. या धडकेत जीपचे मोठे नुकसान झाले. मृतांमध्येही सर्वाधिक जीपमधील आहेत. दरम्यान, मुथरेतही भीषण अपघाताची घटना घडली. एक भरधाव थार आणि एका प्रवासी टेम्पोमध्ये झालेल्या धडकेत अनेक जण जखमी झाले. रस्त्यावर ओरड आणि आरडाओरडा सुरू झाला. तेव्हा एका भरधाव डंपरने जखमींना चिरडले ज्यात चार जणांचा मृत्यू झाला. मथुराच्या जैत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रामताल नागला जाणा-या रस्त्यावर कृष्णा कुटीरजवळ हा अपघात झाला. भरधाव वेगाने येणा-या एका कारने एका प्रवासी टेम्पोला धडक दिली होता. टक्कर इतकी जोरदार होती की टेपचे तुकडे तुकडे झाले. त्यानंतर जखमी रस्त्यावर थांबलेले असताना भरधाव डंपरने जखमींना चिरडले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR