16.2 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeराष्ट्रीय‘इंडिया’ आघाडी सध्या मजबूत नाही

‘इंडिया’ आघाडी सध्या मजबूत नाही

ओमर अब्दुल्लांची स्पष्टोक्ती

कुपवाडा : भाजप विरोधात विरोधी पक्षांची इंडिया आघाडातील मतभेद वारंवार चव्­हाट्यावर येत आहेत. आता या आघाडीतील मित्र पक्ष नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही आघाडीत सारे काही आलबेल नसल्­याचे स्­पष्­ट केले आहे. तसेच याबाबत त्­यांनी खंतही व्­यक्­त केली आहे.

कुपवाडा येथे माध्­यमांशी बोलताना ओमर अब्दुल्ला म्हणाले की, इंडिया आघाडीची स्थिती सध्या मजबूत नाही. आघाडीची अशी स्थिती असणे हे दुर्दैवी आहे. काही अंतर्गत भांडणे आहेत. अशा प्रकारचे भांडणे असू नयेत. विशेषत: आगामी विधानसभा निवडणुका असणा-या ५ राज्­यांमध्­ये तरी अशा प्रकारे मतभेद असू नयेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीतील मित्र पक्ष समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्­या लढत रंगली आहे. दोघांनीही उत्तर प्रदेश विधानसभेच्­या सर्व जागा लढविण्­याचा निर्धार केला आहे. हे इंडिया आघाडीसाठी चांगले नाही. कदाचित याबाबत आम्­ही पुन्­हा चर्चा करु. राज्­याच्­या निवडणुकांवेळी इंडिया आघाडीचे ऐक्­य कायम ठेवण्­यासाठी प्रयत्­न करु, असा विश्­वासही ओमर अब्दुल्ला यांनी यावेळी व्­यक्­त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR