24.1 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeराष्ट्रीयसीमेवर २ मृतदेह आढळले

सीमेवर २ मृतदेह आढळले

पाकिस्तानी ओळखपत्र सापडले

जैसलमेर : राजस्थानमधील जैसलमेर येथील भारतपाकिस्तान सीमेजवळ एका १५ वर्षीय मुलीचे आणि तरुणाचे मृतदेह सापडले आहेत. हे मृतदेह सुमारे ६-७ दिवसापूर्वीचे असल्याचे सांगितले जात आहे. मृतदेहांजवळ पाकिस्तानी सिम कार्ड आणि ओळखपत्रे आढळली आहेत. हे दोघेही पाकिस्तानी असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोन्ही मृतदेह भारत-पाकिस्तान सीमेच्या कुंपणाच्या आत सुमारे १० ते १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या भारतीय सीमेवरील साडेवाला परिसरात आढळले. तनोट पोलिसांनी दोन्ही मृतदेह रामगड सीएचसीच्या शवागारात ठेवले आहेत. दोघांच्याही मृत्यूचे कारण शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल. हे दोघेही भारतातील आहेत की पाकिस्तानी आहेत याचा तपास सुरू आहे.

पाक ओळखपत्र, सिमकार्ड जप्त
या दोघांच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या तरुणाचे नाव रवी कुमार वडिलांचे नाव दिवान जी, तर मुलीच्या कार्डवर शांती बाई असे नाव आहे. मुलगी अल्पवयीन असल्याचे सांगितले जात आहे. दोघेही एकाच जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सिमकार्ड आणि ओळखपत्रांसह सापडलेल्या मृतदेहांबाबत सुरक्षा संस्था, सीमा सुरक्षा दल, जैसलमेर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. जवळच्या गावांमध्येही चौकशी सुरू आहे. पाकिस्तानचा व्हिसा घेतल्यानंतर दोघेही जैसलमेरमध्ये राहत असण्याची शक्यता आहे. यासोबतच, त्यांनी काटेरी तारांचे कुंपण ओलांडले असण्याचीही शक्यता आहे. सुरक्षा एजन्सी तपास करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR