पंचमहाल : गुजरातमधील पंचमहाल जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळी सैनिकांना घेऊन जाणारी बस उलटली. या अपघातात राज्य राखीव पोलिसचे ३८ पोलिस जखमी झाले आहेत. एमएल गोहित या पोलिस अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३८ सैनिक जखमी झाले आहेत. सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जवानांची प्रकृती स्थिर आहे.
ही घटना घडली तेव्हा जवान गोळीबाराचा सराव पूर्ण करून परतत होते, अशी माहिती अधिका-यांनी दिली आहे. अपघाताची माहिती देताना ते म्हणाले, ब्रेक फेल झाल्याने बस उलटली आहे. रिपोर्टनुसार, अपघाताच्या वेळी बसमध्ये ५० सैनिक होते. त्यापैकी ३८ जवान जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हलोल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी २९ जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले, तर गंभीर जखमी असलेल्या नऊ जणांना उपचारांसाठी वडोदरा येथील सयाजी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. ब्रेक फेल झाल्यामुळे बस दरीत कोसळल्याचं सांगण्यात येत आहे.