लातुरात जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात

लातूर : प्रतिनिधी
जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचा जयघोष करत संपूर्ण लातूर शहरात बसवेश्वर महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील विविध भागातही महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त ठिकठिकाणी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आझाद चौकातून महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शनिवारी रात्री महात्मा बसवेश्वर चौक रिंग रोड येथील बसवेश्वरांच्या अश्वारूढ पुतळा समोर मध्यरात्री महात्मा बसवेश्वर कॉलेज समोरील बसवेश्वरांच्या पुतळ्यास गवळी समाजाच्या वतीने दुग्धाभिषेक करण्यात आले. रविवारी सकाळी महात्मा बसवेश्वरांच्या अश्वारूढ पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तदनंतर मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. दुपारी पाचशे घर मठ येथे बसव जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आझाद चौक ते  महात्मा बसवेश्वर कॉलेज येथील बसवेश्वरांच्या पुतळ्यापर्यंत महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेची भव्य-दिव्य शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते.
महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यास खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, महापौर जयश्रीताई सोनकांबळे, उपमहापौर स्रेहल उटगे, कैलास कांबळे, विजयकुमार साबदे, दगडूआप्पा मिटकरी आदिसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महात्मा बसवेश्वर महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. निलेश मुचाटे, स्वागताध्यक्ष प्रा.भालचंद्र येडवे पाटील यांच्यासह जेष्ठ मार्गदर्शक सिद्रामआप्पा पोपडे, माजी अध्यक्ष केदारआप्पा रासुरे, उपाध्यक्ष विश्वास आंबेकर, सचिव बालाजी झिपरे, सहसचिव रोहीत चवळे, कोषाध्यक्ष लखन कावळे, कार्याध्यक्ष मुकेश उटगे, बालाजी पाटील रायवाडीकर, गणेश हेरकर, संयोजक नितीन मोहनाळे, जगदीश येरटे, बसवेश्वर हेंगणे, प्रा. ओमप्रकाश झुरुळे,अ‍ॅड.निखिल काळगे, सोमेश्वर ईश्वरशेटे, शिवकुमार रोडे, प्रमोद धुपे, लक्ष््मीकांत रासुरे, मन्मथ सोरटे, सुशील वेळापुरे, निखिल शेटकार, शरणाप्पा अंबुलगे, कल्याण लातूरे, मोहन मेंगशेट्टे, सुनील ताडमाडगे, किरण खोबरे आदिसह समाज बांधवांनी परिश्रम घेतले.
सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने राबविण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमांचे नागरीकातून स्वागत करण्यात आले. जयंतीचे औचित्य साधून शहरात ठिकठिकाणी शरबत, मठ्ठा  वितरित करण्यात आला. संपूर्ण लातूर शहर व जिल्ह्यात रविवारी बसवमय वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
क्रिकेटच्या मैदानावर लातूरच्या मुलींची ऐतिहासिक एन्ट्री; धिरज देशमुख यांच्याकडून कौतुक!
01:46
Video thumbnail
श्वास रोखला अन् क्षणात घात झाला; जिममध्ये तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
00:26
Video thumbnail
पाकिस्तान हादरलं! क्वेटा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेगाडीवर भीषण आत्मघाती हल्ला; २४ हून अधिक सैनिकांचा
00:55
Video thumbnail
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सावरखेड मार्गावर धावली एस.टी. बस; ग्रामस्थांचा पेढे वाटून जल्लोष!
01:46
Video thumbnail
BREAKING: ट्युशन एरिया केवळ उद्योगांसाठीच राखीव; नियमबाह्य व्यवसाय बंद करण्याचे आदेश, परिसर सामसूम!
02:20
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|RCC क्लासेसवर पुन्हा CBI ची धाड;तपासाचा फास आणखी आवळला
01:54
Video thumbnail
मानवत तालुक्यात डिझेल भरण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कॅनने एकमेकांना झोडपले, व्हिडिओ व्हायरल!
00:49
Video thumbnail
जळकोट तालुक्यात एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा; सिलिंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा
01:15
Video thumbnail
Shivraj motegavkar|मोटेगावकरची सोन्याची लंका; आदर्श कॉलनीत निर्माण होतंय शिश महल...
02:25
Video thumbnail
Latur|लातुरात मोकाट कुत्र्यांविरोधात गांधीगिरी आंदोलन;प्रभुराज प्रतिष्ठानचे अनोखे आंदोलन चर्चेत
02:15
Video thumbnail
Shivraj Motegavkar|NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा नवा व्हिडिओ व्हायरल..
01:43
Video thumbnail
नांदेड आगारातून चक्क एसटी बस चोरीचा प्रयत्न; चालकाचे प्रसंगावधान, आरोपी गेटवरच जेरबंद
01:22
Video thumbnail
व्हाईट हाऊसजवळ अंदाधुंद गोळीबार; सुरक्षा दलांच्या प्रत्युत्तरात संशयित हल्लेखोर ठार, ट्रम्प सुरक्षित
01:46
Video thumbnail
निसर्गाची अद्भूत करणी! अवघ्या १२ फुटांवर लागलं पाणी
01:46
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये भाजीपाल्याचे दर गगनाला;गृहिणींचे बजेट कोलमडले
02:05

Latest news