पुरुषांच्या तुलनेत महिलांचे आयुष्य अधिक

नवी दिल्ली : पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक काळ जगत असल्या तरी त्यांना आयुष्यातील अधिक वर्षे पाठदुखी, नैराश्य, चिंता आणि इतर दीर्घकालीन आजारांशी झुंज देत घालवावा लागत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. द लॅन्सेट पब्लिक हेल्थ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनाने महिलांच्या आरोग्याविषयीचे एक गंभीर वास्तव समोर आले आहे.

२०४ देश आणि प्रदेशांतील आकडेवारीच्या आधारे करण्यात आलेल्या या अभ्यासानुसार, महिलांमध्ये जीवनमानावर परिणाम करणा-या अनेक दीर्घकालीन आणि प्राणघातक नसलेल्या आजारांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या अधिक आहे. दुसरीकडे पुरुषांना जीवघेण्या आजारांमुळे आणि दुखापतींमुळे अकाली मृत्यू येण्याची शक्यता जास्त असते. संशोधकांच्या मते, जगभरातील महिलांना सर्वाधिक त्रास देणारी समस्या म्हणजे कंबरदुखी. याशिवाय नैराश्य, चिंताविकार, डोकेदुखी, स्रायू व हाडांशी संबंधित विकार तसेच स्मृतिभ्रंश यांचा महिलांवर अधिक परिणाम होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या निष्कर्षांमुळे जास्त आयुष्य म्हणजे चांगले आरोग्य ही सर्वसाधारण समजूत आव्हानासमोर उभी राहिली आहे. साकेत येथील मॅक्स हॉस्पिटल, साकेत येथील इंटर्नल मेडिसिन विभागाचे संचालक डॉ. रोमेल टिकू यांनी सांगितले की, केवळ दीर्घायुष्य हे उत्तम आरोग्याचे मापदंड ठरू शकत नाही. महिला अधिक काळ जगत असल्या तरी त्यांना आयुष्याचा मोठा कालावधी दीर्घकालीन वेदना, मानसिक आरोग्याच्या समस्या आणि अपंगत्व आणणा-या आजारांशी सामना करण्यात खर्च करावा लागतो असे त्यांनी स्पष्ट केले.

मुलींमध्ये मानसिक आरोग्याची समस्या
अभ्यासानुसार, महिला आणि पुरुषांमधील आरोग्यविषयक तफावत लहान वयापासूनच दिसून येते आणि वयानुसार ती अधिक वाढत जाते. किशोरवयातच मुलींमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या आणि स्रायू-हाडांच्या विकारांचे प्रमाण वाढू लागते, जे पुढे प्रौढावस्थेतही कायम राहते. डॉ. टिकू यांच्या मते, यामागे जैविक आणि हार्मोनल घटक, स्वयंप्रतिकार विकारांची अधिक शक्यता, स्रायू-हाडांचे आजार तसेच कुटुंबीयांची काळजी घेण्याच्या सामाजिक जबाबदा-या यांसारखी अनेक कारणे असू शकतात. या सर्वांचा महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

पुरूषांमध्ये अकाली मृत्यूचा धोका जास्त
संशोधकांनी असेही नमूद केले की, अनेक देशांतील आरोग्य व्यवस्था अजूनही प्रामुख्याने प्रजनन आणि मातृत्व आरोग्यावर केंद्रित आहेत. त्यामुळे महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणा-या दीर्घकालीन आजारांकडे तुलनेने दुर्लक्ष होत आहे. याउलट, पुरुषांमध्ये कोविड-१९, हृदयविकार, रस्ते अपघात आणि दीर्घकालीन श्वसनविकारांचे प्रमाण अधिक आढळले. त्यामुळे पुरुषांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तुलनेने जास्त असल्याचेही या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|राजमाता अहिल्यादेवींचे विचार घराघरात पोहोचले पाहिजेत : दिलीपराव देशमुख
05:50
Video thumbnail
Latur|लातूर रेल्वे स्थानकाच्या विकासाला वेग; बहुप्रतीक्षित पिटलाईन डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार
02:27
Video thumbnail
Nanded|तारण ठेवलेल्या सोन्यावरच बँक अधिकाऱ्यांचा डल्ला; SBI मधील 85 लाखांचा घोटाळा उघड
03:58
Video thumbnail
Latur|लातुरात अहिल्यादेवी जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
04:21
Video thumbnail
मास्टर ब्लास्टरचा पाककौशल्य 'सिक्सर'; सचिन तेंडुलकरने बनवले खास उकडीचे मोदक
00:40
Video thumbnail
थिएटरच्या स्क्रीनमधून थेट स्कॉर्पिओ बाहेर! व्हिडिओ पाहून प्रेक्षकांची धांदल
00:18
Video thumbnail
अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याची दृश्ये कॅमेऱ्यात कैद; पहा 'क्लिअर' व्हिडिओ
00:30
Video thumbnail
मराठा आरक्षण आंदोलन; सरकारच्या सकारात्मक भूमिकेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतले उपोषण
00:56
Video thumbnail
Manoj Jaramge Andolan|मनोज जरांगेंच्या आंदोलनाचे पडसाद; लातुरात मराठा समाजाचा रास्ता रोको
01:35
Video thumbnail
Latur|जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प मिळून फक्त 32 टक्के पाणी साठा;अनेक गावांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा.
03:04
Video thumbnail
Latur|डिझेल संपलं! लातूर जिल्ह्यात इंधन टंचाईचे सावट
02:29
Video thumbnail
Latur|NEET पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरच्या आर्थिक व्यवहारांचा CBI तपास...
04:33
Video thumbnail
Latur|माजी आमदार धिरज देशमुखांच्या पुढाकाराने कॅनॉलला पाणी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा
02:35
Video thumbnail
साकोळ येथे बकरी ईदनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन; मुस्लीम बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
05:42
Video thumbnail
‘हिल हिल पोरी हिला’ वर डॅनी पंडित आणि धनश्री वर्माचा धमाका! पाहा भन्नाट डान्स रील.
00:58

Latest news