उन्हाळ््यात वाहनांसाठी जागा शोधली, आता पावसाळयात झाडांसाठी जागा शोधा!

लातूर : प्रतिनिधी
वाढते तापमान, घटणारी हरित संपदा आणि बदलते पर्यावरणीय संतुलन याबाबत समाजात जागृती निर्माण करण्यासाठी वसुंधरा प्रतिष्ठान, लातूर यांनी पावसाळ्यापूर्वीच व्यापक जनजागृती मोहीम सुरू केली आहे. ‘उन्हाळ्यात गाडी लावण्यासाठी जागा शोधत होतात ना? मग आता पावसाळ्यात झाडे लावण्यासाठी जागा शोधा’ असा थेट आणि विचार करायला लावणारा संदेश असलेले आकर्षक फलक शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि गर्दीच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत.
या फलकांद्वारे ‘एक व्यक्ती-एक झाड’ ही संकल्पना प्रभावीपणे मांडण्यात आली असून वृक्षलागवड आणि संगोपन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. वड, कडुलिंब, गुलमोहर, बहावा, जांभूळ, आंबा, पारिजात व आवळा यांसारख्या पर्यावरणपूरक वृक्षांची माहिती देत त्यांचे सामाजिक, पर्यावरणीय व आरोग्यदायी महत्त्वही जनतेसमोर मांडण्यात आले आहे. वाढते प्रदूषण, भूजल पातळीतील घट, उष्णतेच्या लाटा आणि पर्यावरणीय असमतोलाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, हा संदेश प्रतिष्ठानच्या या मोहिमेतून दिला जात आहे.
विशेष म्हणजे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच वृक्षलागवडीसाठी अनुकूल वातावरण तयार करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून दिसून येत आहे. वसुंधरा प्रतिष्ठानने उभारलेल्या या जनजागृती फलकांमुळे नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू झाली असून पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला नवी दिशा मिळत असल्याची भावना व्यक्त होत आहे. सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घेणा-या या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे, अशी माहिती या प्रतिष्ठानचे प्रा. योगेश शर्मा यांनी दिली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|राजमाता अहिल्यादेवींचे विचार घराघरात पोहोचले पाहिजेत : दिलीपराव देशमुख
05:50
Video thumbnail
Latur|लातूर रेल्वे स्थानकाच्या विकासाला वेग; बहुप्रतीक्षित पिटलाईन डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार
02:27
Video thumbnail
Nanded|तारण ठेवलेल्या सोन्यावरच बँक अधिकाऱ्यांचा डल्ला; SBI मधील 85 लाखांचा घोटाळा उघड
03:58
Video thumbnail
Latur|लातुरात अहिल्यादेवी जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
04:21
Video thumbnail
मास्टर ब्लास्टरचा पाककौशल्य 'सिक्सर'; सचिन तेंडुलकरने बनवले खास उकडीचे मोदक
00:40
Video thumbnail
थिएटरच्या स्क्रीनमधून थेट स्कॉर्पिओ बाहेर! व्हिडिओ पाहून प्रेक्षकांची धांदल
00:18
Video thumbnail
अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याची दृश्ये कॅमेऱ्यात कैद; पहा 'क्लिअर' व्हिडिओ
00:30
Video thumbnail
मराठा आरक्षण आंदोलन; सरकारच्या सकारात्मक भूमिकेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतले उपोषण
00:56
Video thumbnail
Manoj Jaramge Andolan|मनोज जरांगेंच्या आंदोलनाचे पडसाद; लातुरात मराठा समाजाचा रास्ता रोको
01:35
Video thumbnail
Latur|जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प मिळून फक्त 32 टक्के पाणी साठा;अनेक गावांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा.
03:04
Video thumbnail
Latur|डिझेल संपलं! लातूर जिल्ह्यात इंधन टंचाईचे सावट
02:29
Video thumbnail
Latur|NEET पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरच्या आर्थिक व्यवहारांचा CBI तपास...
04:33
Video thumbnail
Latur|माजी आमदार धिरज देशमुखांच्या पुढाकाराने कॅनॉलला पाणी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा
02:35
Video thumbnail
साकोळ येथे बकरी ईदनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन; मुस्लीम बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
05:42
Video thumbnail
‘हिल हिल पोरी हिला’ वर डॅनी पंडित आणि धनश्री वर्माचा धमाका! पाहा भन्नाट डान्स रील.
00:58

Latest news