अंतर्दृष्टी वाढविण्यासाठी शास्त्रीय संगीत वाचवा 

लातूर : प्रतिनिधी
अनेकदा संगीत हा मनोरंजनाचा विषय मानला जातो. पण तसे नाही. कारण शास्त्रीय संगीतातून अंतर्दृष्टी प्राप्त होते. अंतर्दृष्टी वाढविण्यासाठी संगीत वाचविणे अत्यंत आवश्यक आहे. एवढेच नव्हे तर त्याचा प्रचार, प्रसार करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ख्यातनाम गायक पं. अजय चक्रवर्ती यांनी येथे केले.
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्तेश्री ज्ञान सरस्वती मंदिर संस्थेचा ‘स्वरतालयोगी पं. गोविंदराव बोरगावकर स्मृती पुरस्कार’ पं. अजय चक्रवर्ती यांना प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार विक्रम काळे, उद्योजक तुकाराम पाटील, आयोजक डॉ. राम बोरगावकर, पं. बाबूराव बोरगावकर आदी उपस्थित होते. पगडी, शाल, स्मृतिचिन्ह आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पं. अजय चक्रवर्ती यांनी ही पुरस्काराची रक्कम ज्ञान सरस्वती मंदिर संस्थेला लगेचच परत केली.
पं. अजय चक्रवर्ती म्हणाले की, मी लातूरमध्ये जवळपास ३५ वर्षांनंतर आलो आहे. इथे झालेल्या सन्मानाने मी भारावून गेलो. कारण हा महाराष्ट्राचा पुरस्कार आहे. महाराष्ट्रातील अनेक नामवंत कलावंतांकडून आजवर काही ना काही शिकता आले. हे विसरता येणार नाही. कलावंत या नात्याने मोठ्या शहरांमध्ये आम्ही नेहमीच जातो. या पुरस्काराच्या निमित्ताने लातूरसारख्या लहान शहरात येता आले. इथे शास्त्रीय संगीतासाठी सुरु असलेले प्रयत्न पाहता आले., याचे मला समाधान आहे.
यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले की, गायन मुळातच कठीण आहे. त्याहून अधिक कठिण संगीत शिकविणे आ.हे.ही दोन्ही कार्य पं. अजय चक्रवर्ती मोठ्या खुबीने करतात, हे कौतुकास्पद आहे. आमची प्रत्यक्ष ही पहिलीच भेट असली  तरी त्यांना अनेक वर्षांपासून मी ऐकत आलो  आहे. त्यांना पुरस्कार देण्याची संधी मिळाली, हा माझाच एका प्रकारे गौरव आहे., असेही ते म्हणाले. पुरस्कार सोहळ्याआधी सरस्वती बोरगावकर यांचे गायन झाले. त्यांना अंबरीश शीलवंत (तबला), बाबूराव बोरगावकर (हार्मोनियम) यांनी साथ केली. त्यानंतर पं. अजय चक्रवर्ती यांचे सूरेल गायन अनुभवण्याची लातूरकरांना संधी मिळाली. त्यांना स्वप्नील भिसे (तबला), अजय जोगळेकर (हार्मोनियम), मेहेर परळीकर (तानपुरा) यांनी साथ दिली. प्रा. कल्पना देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|राजमाता अहिल्यादेवींचे विचार घराघरात पोहोचले पाहिजेत : दिलीपराव देशमुख
05:50
Video thumbnail
Latur|लातूर रेल्वे स्थानकाच्या विकासाला वेग; बहुप्रतीक्षित पिटलाईन डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार
02:27
Video thumbnail
Nanded|तारण ठेवलेल्या सोन्यावरच बँक अधिकाऱ्यांचा डल्ला; SBI मधील 85 लाखांचा घोटाळा उघड
03:58
Video thumbnail
Latur|लातुरात अहिल्यादेवी जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
04:21
Video thumbnail
मास्टर ब्लास्टरचा पाककौशल्य 'सिक्सर'; सचिन तेंडुलकरने बनवले खास उकडीचे मोदक
00:40
Video thumbnail
थिएटरच्या स्क्रीनमधून थेट स्कॉर्पिओ बाहेर! व्हिडिओ पाहून प्रेक्षकांची धांदल
00:18
Video thumbnail
अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याची दृश्ये कॅमेऱ्यात कैद; पहा 'क्लिअर' व्हिडिओ
00:30
Video thumbnail
मराठा आरक्षण आंदोलन; सरकारच्या सकारात्मक भूमिकेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतले उपोषण
00:56
Video thumbnail
Manoj Jaramge Andolan|मनोज जरांगेंच्या आंदोलनाचे पडसाद; लातुरात मराठा समाजाचा रास्ता रोको
01:35
Video thumbnail
Latur|जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प मिळून फक्त 32 टक्के पाणी साठा;अनेक गावांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा.
03:04
Video thumbnail
Latur|डिझेल संपलं! लातूर जिल्ह्यात इंधन टंचाईचे सावट
02:29
Video thumbnail
Latur|NEET पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरच्या आर्थिक व्यवहारांचा CBI तपास...
04:33
Video thumbnail
Latur|माजी आमदार धिरज देशमुखांच्या पुढाकाराने कॅनॉलला पाणी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा
02:35
Video thumbnail
साकोळ येथे बकरी ईदनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन; मुस्लीम बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
05:42
Video thumbnail
‘हिल हिल पोरी हिला’ वर डॅनी पंडित आणि धनश्री वर्माचा धमाका! पाहा भन्नाट डान्स रील.
00:58

Latest news