अमेरिकेवर इराणचा प्रतिहल्ला; ८ लष्करी तळ उद्ध्वस्त केल्याचा ‘IRGC’चा दावा

तेहरान: मध्य पूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला असून इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांवर मोठा प्रतिहल्ला केला आहे. इराणची गुप्तचर संस्था आणि लष्कराचा मुख्य भाग असलेल्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) हा दावा केला आहे. इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात अमेरिकेचे तब्बल ८ लष्करी तळ उद्ध्वस्त झाले आहेत. हा हल्ला प्रामुख्याने कुवेत आणि बहरीनमध्ये असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर आणि नौदलाच्या ‘फिफ्थ फ्लिट’ (Fifth Fleet) या विभागावर करण्यात आला.

अमेरिकेने काही काळापूर्वी इराणच्या किनारपट्टीवरील ५ चौक्यांना लक्ष्य केले होते. त्याचाच बदला म्हणून हा भीषण हल्ला करण्यात आल्याचे इराणने स्पष्ट केले आहे. अमेरिकेने युद्धविराम कराराचे उल्लंघन केल्याचा आरोपही इराणकडून करण्यात आला. हॉर्मुझ जलडमरू (Strait of Hormuz) परिसरातील सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्था ही संपूर्णपणे इराणच्या नियंत्रणात असून, अमेरिकेने या नियमांचे उल्लंघन करून प्रक्षोभक कारवाई केली होती, असा दावा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.

इराणच्या या प्रतिहल्ल्यात अमेरिकेचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले असून, सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेने या नुकसानीची उपग्रह चित्रे (Satellite Images) जारी करण्यास मनाई केली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी वॉशिंग्टनला चेतावणी दिली आहे की, जर अमेरिकेने पुन्हा अशी कोणतीही लष्करी आगळीक केली, तर यापेक्षाही मोठा आणि तीव्र हल्ला केला जाईल. तसेच अमेरिकेने स्वतःच्या सुरक्षेसाठी या संपूर्ण क्षेत्रातून आपले सैन्य मागे घ्यावे, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या ताज्या हल्ल्यामुळे संपूर्ण आखाती देशांमध्ये युद्धाचे ढग गडद झाले असून परिस्थिती गंभीर बनली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पर्यावरण संरक्षण कायदा ठरतोय कुचकामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण गढूळ...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Rain Update|लातूरमध्ये मुसळधार पावसाची दमदार बॅटिंग; उकाड्यापासून दिलासा
02:33
Video thumbnail
Latur Railway Update|खासदार शिवाजी काळगे यांचा मोठा दावा; लवकरच नवी लातूर–मुंबई रेल्वे
02:16
Video thumbnail
लातुरात विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी #marathilivenews #maharashtranews
03:01
Video thumbnail
Babasaheb patil on karjmukti|कर्जमाफीवर अखेर सरकारचं मौन तुटलं; सहकार मंत्र्यांचा मोठा दावा!
03:53
Video thumbnail
Latur|लातूरच्या नाट्यप्रेमींसाठी गुड न्यूज! नाट्यगृहाचे काम पुन्हा मार्गी
03:19
Video thumbnail
TET परीक्षा पेपरफुटीच्या निषेधार्थ परभणीत अभाविपचे तीव्र आंदोलन #marathilivenews
00:10
Video thumbnail
खासदार संजय जाधव यांनी पक्ष सोडल्यानंतर परभणीत उद्धव ठाकरे यांचं जंगी स्वागत #marathilivenews
00:53
Video thumbnail
LIVE-बंडखोरी नंतर उद्धव ठाकरे यांची यवतमाळ येथून पहिली जाहीर सभा
45:42
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या पीकविम्यावरून शिवसेना आक्रमक; आंदोलनाचा इशारा
05:07
Video thumbnail
Latur|अवैध दारूविरोधात महिलांचा एल्गार; विक्रेत्याच्या घरात घुसून मारहाण!
03:05
Video thumbnail
Latur|लातूर DPC बैठकीत अनेक अधिकारी गैरहजर;पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश
02:53
Video thumbnail
LIVE-बंडखोरी नंतर उद्धव ठाकरे यांची यवतमाळ येथून पहिली जाहीर सभा
00:00
Video thumbnail
Latur|आरक्षण उपवर्गीकरणावरून लातूरमध्ये एल्गार; ६ जुलैला भव्य मोर्चा!
10:13
Video thumbnail
महाराष्ट्रातील या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस;हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांचा अंदाज
04:03
Video thumbnail
Latur|अवैध दारू विक्री करणारा ढाबा संतप्त नागरिकांनी जाळला
04:42

Latest news