मनसे करणार स्मार्ट मीटरची होळी

औसा : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील महावितरणच्या प्रत्येक शाखा कार्यालयासमोर मनसेच्या वतीने स्मार्ट मीटरची होळी आंदोलन करण्यात येणार असून पहिले आंदोलन ३ जुलै २०२६ वार शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता महावितरण शाखा कार्यालय किल्लारी (ता.औसा) येथे करण्यात येणार आहे.
राज्यात महावितरणचे अदानीकरण झाले असून स्मार्ट मीटरच्या अडून महावितरणच्या सर्वसामान्य ग्राहकाचे खिसे कापले जात आहेत. खरंतर हे स्मार्ट मीटर नाही तर याला एक प्रकारचा डिजिटल दरोडाच म्हणावा लागेल. ग्राहकाची कुठल्याही प्रकारची मागणी नसताना व त्यांची पूर्वपरवानगी न घेता महावितरणने जिल्ह्यात अनेक ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांना ते स्मार्ट मीटर बसवल्यापासून घरी पिठाची चक्की, मिरची कांडप, तेलाचा घाना याला जशा प्रकारे बील येते त्या प्रकारे सामान्य ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बीलं येत आहे. विजेचा वापर कमी आणि बिले जास्त येत असल्याने ग्राहकाच्या मनामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून जिल्हयत सगळीकडे स्मार्ट मीटरच्या विरोधात ग्राहक तक्रारी करीत आहेत.
ग्राहकांना बसत असलेला अतिरिक्त आर्थिक भुर्दंड लक्षात घेता महावितरण ते स्मार्ट मीटर काढून पूर्वीचे मीटर बसवावे व यापुढे ग्राहकावर आर्थिक भुर्दंड लादू नये. या मागणी करिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा लातूरच्या वतीने महावितरणच्या प्रत्येक शाखा कार्यालयासमोर स्मार्ट मीटरची होळी आंदोलन करण्यात येणार आहे. त्या आंदोलनाची सुरुवात ३ जुलै २०२६ वार शुक्रवार रोजी मनसेचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे शाखा कार्यालय किल्लारी ता.औसा येथे सकाळी ११ वा.करण्यात येणार आहे. त्या आशयाचे निवेदन संबंधित कार्यालयास देण्यात आले. याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे, तालुकाध्यक्ष धनराज गिरी, माजी तालुकाध्यक्ष मुकेश देशमाने, सचिव अमोल परिहार, तालुका उपाध्यक्ष महादेव गायकवाड पवार, मच्छींद्र मेंढे, महेश बिराजदार, शिवाजी कुलकर्णी, अतुल पाटील, गणेश रामपुरे, अभिषेक सोनटक्के, नामदेव गायकवाड, साईनाथ जाधव, मोरारी गायकवाड, करण खराते, अमर जाधव, अशोक बनसोडे, कामा नाईक, राहूल जाधव, महादेव गायकवाड, विकास पल्ले, करण गायकवाड, अंगद बनसोडे, अनिल खराते, दयानंद जाधव, विश्वास चव्हाण, अमित पाटील, मच्छीद्र तौर, आलोदिन शेख, बबन पाटील, इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पर्यावरण संरक्षण कायदा ठरतोय कुचकामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण गढूळ...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|पाणीपुरी खाल्ली आणि १६ जण रुग्णालयात; कंधार हादरला!
01:15
Video thumbnail
Latur|मान्सूनपूर्व कामांचा दावा हवेत; पहिल्याच पावसात लातूर जलमय
02:33
Video thumbnail
Latur Manapa|लातूर मनपा ठप्प! कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा नागरिकांना फटका
01:58
Video thumbnail
Udgir Farmer Andolan|हातात नांगर, सरकारविरोधात एल्गार; उदगीरमध्ये शेतकऱ्यांचा सत्याग्रह!
03:10
Video thumbnail
Latur|रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात हरंगुळ येथील नागरिक आक्रमक;बांधकाम विभागासमोर अर्धनग्न आंदोलन
02:29
Video thumbnail
Latur Manpa Andolan|दोन महिन्यांपासून पगार नाही; मनपा कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
04:07
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये 'नाते शतजन्माचे'; परिचय संमेलनाला मोठा प्रतिसाद!
03:08
Video thumbnail
Latur|TET पेपरफुटीवर उदगीरमध्ये अभाविपचा एल्गार; सरकारविरोधात जोरदार आंदोलन!
02:30
Video thumbnail
अयोध्या राम मंदिर प्रकरणात दोषींना सोडलं जाणार नाही - केंद्रीय मंत्री चिराग पासवान
01:31
Video thumbnail
Udhav Thakre sabha|परभणीत उद्धव ठाकरेंचा एल्गार; बंडखोरांवर थेट हल्लाबोल!
05:46
Video thumbnail
Hingoli|कृषिमंत्र्याच्या प्रतिमेला पैशाचा हार घालून क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन
00:57
Video thumbnail
Sanjay Jadhav On Sanjay Raut|"हम तो इतने बेशरम हैं..." म्हणत जाधवांचा राऊतांवर निशाणा
04:28
Video thumbnail
Rain Update|लातूरमध्ये मुसळधार पावसाची दमदार बॅटिंग; उकाड्यापासून दिलासा
02:33
Video thumbnail
Latur Railway Update|खासदार शिवाजी काळगे यांचा मोठा दावा; लवकरच नवी लातूर–मुंबई रेल्वे
02:16
Video thumbnail
लातुरात विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी #marathilivenews #maharashtranews
03:01

Latest news