चाकूर : प्रतिनिधी
शहरात पहिल्याच पावसाने दाणादाण उडाली असून सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती तर काही ठिकाणी गटारी तुंबल्याने रस्त्यावर प्लास्टिक पिशव्या आणि पाण्याच्या बाटल्या जमा झाल्या होत्या. शहरातील कमानी जवळील मारूती मंदीराजवळील सखल भागात पावसामुळे पाणी साचल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
तसेच बोथी रस्त्यावरील डॉ.सी.व्ही.नागीमे यांच्या साई हॉस्पीटल समोरच्या भागात पावसाचे पाणी साचल्याने रुग्णालयात येणारा रस्ता बंद झाला होता. त्यामुळे दवाखान्यांत रुग्णांना उपचारांसाठी कसे न्यावे असा प्रश्न निर्माण झाला होता. डॉ.नागीमे यांनी स्वत: या पाण्यांत उभे राहून किती पाणी साचले आहे ते दाखवले आहे. प्रशासन आणि संबंधित नगरसेवकांना माहिती देण्यात आली आणि यावर तातडीने उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
















