न्यूयॉर्क : पेप्सिकोच्या माजी सीईओ इंदिरा नूयी यांनी भारताबाबत एक आक्षेपार्ह वक्तव केले आहे. मूळ भारतीय वंशांच्या असणा-या नूयी यांनी एका मुलाखतीत चीन आणि भारत यांची तुलना देखील केली. त्यांनी चीनची स्तुती करताना भारताच्या संस्कृती आणि सामाजिक व्यवस्थेवर कडक शब्दात टीका केली आहे. इंदिरा नूयी यांनी हूवर इस्टिट्यूशनच्या एका खास मुलाखतीत लीडरशिप, अमेरिका आणि आपला प्रवास याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या.
नूयी यांनी अमेरिकेच्या मेरिटोक्रेटिक म्हणजे योग्यतेच्या आधारावर असलेल्या व्यवस्थेचे गुणगाण केले आहे. त्यांनी जर त्या अमेरिकेत आल्या नसत्या तर त्यांना या उंचीवर पोहचता आले नसते. भारतातील सामाजिक आणि कॉर्पोरेट व्यवस्थेवर टीका करताना इंदिरा नूयी म्हणतात की मला जेवढे यश मिळाले ते भारतात राहून कदाचित मिळाले नसते. त्या म्हणाल्या एक अप्रवासी भारतीय आपल्या खिशात काही न घेता येते एका प्रतिष्ठित कंपनीची सीईओ बनते. असे जगातील कोणत्याही दुस-या देशात होऊ शकत नाही. जगात अनेक देश आहेत. एवढेच काय मी भारतात देखील सीईओ बनू शकले नसते.
















