पुस्तक खरेदीची सक्ती केल्यास कारवाई

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात १५ जूनपासून शाळांना सुरुवात झाली असून आता नियमित शाळा सुरू झाल्याने पालक आणि विद्यार्थी शालेय जीवनात मग्न झाले आहेत. शाळेच्या पहिल्याच आठवड्यात विद्यार्थ्यांना शालेय पाठ्य-पुस्तके आणि इतर साहित्य खरेदीसाठी पालकांची लगबग दिसून येत आहे. मात्र, बहुतांशी खासगी आणि स्वयंअर्थसहाय्य शाळांनी विद्यार्थ्यांना आपल्याच शाळेतून पुस्तके खरेदी करण्याची सक्ती केल्याचे पाहायला मिळाले. आता विधिमंडळ सभागृहात शाळेतील विशिष्ट दुकानातून साहित्य खरेदीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी उत्तर दिले तर अशा शाळांवर लक्ष ठेवण्यासाठी समिती नेमली जाईल, असे मंत्री पंकज भोयर यांनी सांगितले.

राज्यातील अनेक खासगी तसेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संलग्न शाळाकडून विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातून साहित्य खरेदी करण्याची सक्ती करत पालकांची लूट केली जात आहे. विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळांमधून मोठ्या प्रमाणात वाढीव दराने वह्या-पुस्तकांची विक्री करण्यात येत असून खासगी दुकानातून वह्या पुस्तकांच्या विक्रीच्या किंमतीत मोठी तफावत आहे. याबाबत शासनाकडून कोणत्याही शाळांनी विशिष्ट दुकानातून पुस्तक घेण्याबाबतची सक्ती करू नये, असे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत बोलताना म्हटले.

याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास शालेय शिक्षण विभागाकडून कारवाई करण्यात येणार असून काही शाळांना नोटिसा दिल्या असल्याची माहितीही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी लेखी उत्तरातून दिली. शालेय शिक्षण विभागातील शाळांमधून होणा-या या लुटालुटीबाबत सभागृहात चर्चा झाली. यावरून सभागृहात गदारोळही झाला. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी शिक्षणमंत्र्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी याबाबत समिती नेमणार असल्याचे जाहीर केले.

लक्ष ठेवण्यासाठी समितीची घोषणा
शाळांवर लक्ष ठेवण्यासाठी समितीची घोषणा शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केली. त्यामुळे आता ही समिती नेमकी कधी स्थापन होणार आणि समितीकडून खरेच अशा शाळांवर कारवाई होणार का, हे पुढील काळातच पाहायला मिळेल.

१०० कर्मचारी निलंबित
राज्यात यावर्षी पार पडलेल्या इयत्ता १० वी आणि १२ वी बोर्ड परीक्षांमध्ये सामूहिक कॉपी आणि इतर गैरप्रकार घडल्यामुळे १०० कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यापैकी सर्वाधिक प्रकरणे ६५० ही अमरावतीतील आहेत तर ५०१ प्रकरणे संभाजीनगर विभागातील आहेत. १२ वी परीक्षेदरम्यान विविध केंद्रांवर घडलेल्या गैरप्रकार प्रकरणी एकूण १५ गुन्हे दाखल करण्यात आली आहेत. यात अमरावती विभागात ८, नागपूर विभागात ३, छत्रपती संभाजीनगर विभागात ३, लातूरमध्ये १ अशी नोंद आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
04:50:10
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
00:00
Video thumbnail
Latur Traffic Issue|रस्ते बंद करूनही कोंडी कायम? लातूरच्या ट्रॅफिकचा प्रश्न ऐरणीवर
03:00
Video thumbnail
IAS Rahul Kulkarni|लातूर मनपाला अखेर नवे आयुक्त; राहुल कुलकर्णी यांनी स्वीकारला पदभार!
02:04
Video thumbnail
Solapur|दुधनी बाजार समितीत चबुतरा वाद पेटला; ५ तासांच्या आंदोलनानंतर प्रशासनाची माघार
02:23
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये अनधिकृत बॅनर्सविरोधात धडक मोहीम; उच्च न्यायालयाचे सक्त आदेश
03:07
Video thumbnail
लोकनेते विलासराव देशमुख यांचा विकासाचा वारसा; लातूरला विभागीय आयुक्तालयाची गरज – आ. अभिमन्यू पवार
01:47
Video thumbnail
LIVE- विधान परिषद पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
02:24:19
Video thumbnail
LIVE | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन थेट प्रक्षेपण
01:56:55
Video thumbnail
Nanded|"हिंमत असेल तर समोर या!" नागेश पाटील आष्टीकरांचा विरोधकांना इशारा
04:03
Video thumbnail
Latur|लातूर सिटी बसची पोलखोल! तपासणीत धक्कादायक त्रुटी
03:51
Video thumbnail
Latur|फिल्मी स्टाईल पाठलागानंतर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
02:19
Video thumbnail
Latur|जून संपला... पण पाऊस नाही! लातूरचा शेतकरी चिंतेत
05:24
Video thumbnail
HSRP NUMBER PLEAT|HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर RTOची कारवाई सुरू
04:51
Video thumbnail
Breaking News|नांदेडमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यासमोर काळे झेंडे; राजकीय वातावरण तापले!
01:26

Latest news