रामभक्तांच्या भावना दुखावल्या

अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी चोरीच्या प्रकरणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) प्रथमच अधिकृत भूमिका मांडली आहे. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी निवेदन जारी करत या घटनेमुळे देशभरातील रामभक्तांच्या भावना दुखावल्या असल्याचे म्हटले आहे. तसेच या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

दत्तात्रय होसबळे यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीराम जन्मभूमीवरील भव्य मंदिर हे अनेक पिढ्यांच्यांच्या संघर्ष, त्याग आणि कोट्यवधी रामभक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. त्यामुळे मंदिरातील देणगीपेटीतील पैशांच्या कथित चोरीची घटना अत्यंत दुर्दैवी असून, यामुळे संपूर्ण हिंदू समाजाच्या श्रद्धेला धक्का बसला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत उत्तर प्रदेश सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. तपासात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, असेही होसबळे यांनी स्पष्ट केले. संघाने आपल्या निवेदनात मंदिर व्यवस्थापनालाही काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. मंदिराच्या आर्थिक व्यवहारात पूर्ण पारदर्शकता असावी, व्यवस्थापनातील त्रुटी तातडीने दूर कराव्यात आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, याची खात्री करावी, अशी अपेक्षा संघाने व्यक्त केली आहे.

सध्या या प्रकरणामुळे भाविकांमध्ये अनेक प्रश्न आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मंदिर प्रशासन आणि विशेष तपास पथकाने संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य लवकरात लवकर जनतेसमोर आणावे, असेही संघाने म्हटले आहे. दरम्यान, राम मंदिरातील देणगीपेटीतील पैशांच्या कथित अपहारप्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचे चालक टिन्नू यादव तसेच मंदिरातील देणगी मोजण्याच्या प्रक्रियेशी संबंधित काही कर्मचा-यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये दिवसाढवळ्या फिल्मी स्टाईल चोरी; ४ लाख लंपास
01:07
Video thumbnail
Tukaram Munde LIVE :दूध उद्योगावर मोठी कारवाई? मुंढेंचे स्पष्ट संकेत
00:00
Video thumbnail
Tukaram Munde LIVE :दूध उद्योगावर मोठी कारवाई? मुंढेंचे स्पष्ट संकेत
36:07
Video thumbnail
Latur|लातूरवर पाणीसंकटाचे सावट; १३५ गावांचा पर्यायी पाणीपुरवठ्यावर आधार
03:21
Video thumbnail
Latur|घोणशी गावात तरुणाचे विद्युत खांबावर चढून आंदोलन
01:02
Video thumbnail
उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे भीषण अपघात: एलपीजी टँकरचा स्फोट होऊन ४ जणांचा मृत्यू
01:51
Video thumbnail
Latur|स्मार्ट वीज मीटरवरून मनसे आक्रमक; किल्लारीत जोरदार आंदोलन!
04:33
Video thumbnail
LIVE | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन 2026 |Maharashtra Assembly Monsoon Session LIVE
01:38:10
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम; जेसीबीची धडक कारवाई
04:10
Video thumbnail
Latur| अखेर शेतकऱ्याला परत मिळाली बैलजोडी!
04:27
Video thumbnail
शिवसेना UBT प्रमुख उद्धव ठाकरे यांची स्फोटक पत्रकार परिषद लाईव्ह
08:29
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
23:47
Video thumbnail
लातूर-उदगीर महामार्गावर भीषण तिहेरी अपघात; कार, ऑटो आणि दुचाकीच्या धडकेत तिघे गंभीर जखमी
00:53
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
04:50:10
Video thumbnail
Latur Traffic Issue|रस्ते बंद करूनही कोंडी कायम? लातूरच्या ट्रॅफिकचा प्रश्न ऐरणीवर
03:00

Latest news