रेल्वेचा नवा मैलाचा दगड! आता धावणार वंदे भारत कार्गो; मालवाहतूक होणार सुपरफास्ट

नवी दिल्ली:भारतीय रेल्वेने दळणवळण क्षेत्रात आणखी एक मोठी आणि ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली आहे. प्रवाशांच्या सेवेपाठोपाठ आता वंदे भारत संकल्पनेवर आधारित मालगाडी म्हणजेच वंदे भारत कार्गो लवकरच रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. या विशेष ट्रेनची चाचणी यशस्वी झाली असून, यामुळे देशातील मालवाहतूक आता अधिक वेगवान, सुरक्षित आणि सक्षम होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय रेल्वेने मालवाहतुकीचे अचूक व्यवस्थापन करण्यावर विशेष भर दिला आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून देशातील पहिली वंदे भारत कार्गो ईएमयू लवकरच व्यावसायिक सेवेत रुजू होण्याची शक्यता आहे.

ही मालगाडी ताशी १३० किलोमीटर या विक्रमी वेगाने धावण्यास सक्षम आहे. या वेगामुळे ही कार्गो ट्रेन अनेक प्रवासी गाड्यांनाही मागे टाकेल. आतापर्यंत या ट्रेनच्या सर्व चाचण्या मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरल्या आहेत. सध्या आरडीएसओतर्फे विविध मापदंडांवर आधारित तिची अंतिम ऑसिलेशन चाचणी घेतली जात असून या ट्रेनची निर्मिती चेन्नई येथील रेल कोच फॅक्टरीमध्ये करण्यात आली आहे.

या १६ कोच असलेल्या ट्रेनची एकूण माल वाहून नेण्याची क्षमता ३९७ टन इतकी आहे. यामध्ये माल चढवणे आणि उतरवणे सोपे व्हावे यासाठी सर्व कोचमध्ये रोलर बेड आणि मोठे स्वयंचलित दरवाजे बसवण्यात आले आहेत. तसेच दूध, भाजीपाला, फळे यांसारख्या नाशवंत वस्तू कमी तापमानात सुरक्षित वाहून नेण्यासाठी चिलर्स, रेफ्रिजरेटेड रीफर्स आणि फोर्ड व्हेंटिलेशनची खास व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ट्रेनचा वेग, वजन आणि इतर बाबींचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक कोचमध्ये प्रगत सेन्सर्स देखील बसवण्यात आले आहेत.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हाय-स्पीड कार्गो ट्रेनचा प्राथमिक वापर दिल्ली-एनसीआर आणि मुंबई यांसारख्या देशातील प्रमुख व्यापारी मार्गांवर केला जाऊ शकतो. उर्वरित काही तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर, ही ट्रेन अधिकृतपणे व्यावसायिक सेवेसाठी ट्रॅकवर उतरेल. या सुविधेमुळे उद्योग जगताला मोठा फायदा होणार असून मालाची वाहतूक अत्यंत कमी वेळेत पूर्ण होईल.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये दिवसाढवळ्या फिल्मी स्टाईल चोरी; ४ लाख लंपास
01:07
Video thumbnail
Tukaram Munde LIVE :दूध उद्योगावर मोठी कारवाई? मुंढेंचे स्पष्ट संकेत
00:00
Video thumbnail
Tukaram Munde LIVE :दूध उद्योगावर मोठी कारवाई? मुंढेंचे स्पष्ट संकेत
36:07
Video thumbnail
Latur|लातूरवर पाणीसंकटाचे सावट; १३५ गावांचा पर्यायी पाणीपुरवठ्यावर आधार
03:21
Video thumbnail
Latur|घोणशी गावात तरुणाचे विद्युत खांबावर चढून आंदोलन
01:02
Video thumbnail
उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे भीषण अपघात: एलपीजी टँकरचा स्फोट होऊन ४ जणांचा मृत्यू
01:51
Video thumbnail
Latur|स्मार्ट वीज मीटरवरून मनसे आक्रमक; किल्लारीत जोरदार आंदोलन!
04:33
Video thumbnail
LIVE | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन 2026 |Maharashtra Assembly Monsoon Session LIVE
01:38:10
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम; जेसीबीची धडक कारवाई
04:10
Video thumbnail
Latur| अखेर शेतकऱ्याला परत मिळाली बैलजोडी!
04:27
Video thumbnail
शिवसेना UBT प्रमुख उद्धव ठाकरे यांची स्फोटक पत्रकार परिषद लाईव्ह
08:29
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
23:47
Video thumbnail
लातूर-उदगीर महामार्गावर भीषण तिहेरी अपघात; कार, ऑटो आणि दुचाकीच्या धडकेत तिघे गंभीर जखमी
00:53
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
04:50:10
Video thumbnail
Latur Traffic Issue|रस्ते बंद करूनही कोंडी कायम? लातूरच्या ट्रॅफिकचा प्रश्न ऐरणीवर
03:00

Latest news