नाशिककरांवरील ‘ढगफुटी’चे संकट टळले!

नाशिक : प्रतिनिधी
नाशिककरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. हवामान खात्याने नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर परिसरात तब्बल ३५० मिलीमीटर पावसाचा, म्हणजेच ‘ढगफुटी’चा धडकी भरवणारा इशारा दिला होता. मात्र, पालघरमध्ये हाहाकार उडवणारा पावसाचा ‘भोवरा’ ऐनवेळी नाशिकच्या वेशीवरून उत्तरेकडे गुजरातच्या सुरतच्या दिशेने आणि दक्षिणेकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले परिसराकडे सरकला आहे.

पालघर जिल्ह्यात तब्बल ४५० मिमी पावसाची नोंद करणारा हवामानातील तोच ‘भोवरा’ सोमवारी रात्री त्र्यंबकेश्वर-नाशिक मार्गे सरकण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. यामुळे नाशिकमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. सोमवारी रात्रभर पावसाने शहरात जोरदार हजेरीही लावली. मात्र, मंगळवारी सकाळी हवामानाच्या स्थितीत मोठा बदल झाला. हा भोवरा नाशिककडे न येता उत्तरेकडे गुजरातच्या सुरतच्या दिशेने आणि दक्षिणेकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले परिसराकडे सरकला आहे. यामुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरवरील ढगफुटीचा धोका ब-याच अंशी कमी झाला आहे.

राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची संततधार सुरूच असून हवामान विभागाने आज अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, जालना, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

घाटमाथ्यावर अद्यापही धोक्याचा इशारा
शहरावरील संकट टळले असले तरी, आणि मंगळवारी सकाळी नाशिक शहरात पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी घाटमाथ्यावरील परिस्थिती अद्यापही गंभीर आहे. इगतपुरी, कसारा आणि त्र्यंबकेश्वर भागात मुसळधार पाऊस सतत कोसळत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आणि विशेषत: पर्यटकांनी विनाकारण घराबाहेर किंवा धबधब्यांच्या ठिकाणी जाऊ नये, असे कडक आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Purna|सुहागण MGNREGA घोटाळा; प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित
03:50
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा दणका; लातूरमध्ये अवैध सावकारांविरोधात विशेष मोहीम
02:47
Video thumbnail
Latur|लातूरच्या क्रीडा संकुलात लाखो लिटर पाणी वाया; प्रशासन झोपेत?
02:36
Video thumbnail
Latur|जिल्हा परिषदेच्या पहिल्याच जीबीत इलेक्ट्रॉनिक माध्यमांना 'नो एन्ट्री'!
02:20
Video thumbnail
Latur|आयोध्या प्रकरणाचे पडसाद लातुरात; काँग्रेसचे आंदोलन
05:18
Video thumbnail
Latur|लातुरात भारतीय दलित पँथर आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार आंदोलन
03:58
Video thumbnail
इंद्रायणीला पूर: आळंदीतील चारही पूल पाण्याखाली; भाविकांना आळंदीत न येण्याचे देवस्थानचे आवाहन!
01:12
Video thumbnail
LIVE-लातुरात आज आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात एल्गार!
01:23:37
Video thumbnail
Latur|नांदेडमध्ये धाडसी आजीची कमाल; हातात साप घेऊन पोहोचल्या डॉक्टरांकडे
01:48
Video thumbnail
Latur|'उपवर्गीकरण होऊ देणार नाही!' लातुरात निळ्या वादळाचा सरकारला थेट इशारा
02:47
Video thumbnail
LIVE-लातुरात आज आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात एल्गार!
00:00
Video thumbnail
Latur|उपवर्गीकरणाविरोधात ५८ जाती एकवटल्या; लातूरमध्ये ऐतिहासिक मोर्चा
02:01
Video thumbnail
Latur|रेणापूर तहसील कार्यालयासमोर संभाजी सेनेचे आंदोलन
01:25
Video thumbnail
LIVE-लातुरात आज आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात एल्गार!
02:41
Video thumbnail
Latur|फुटबॉलसाठी लातूर सज्ज... सुरू झाली आंतरराष्ट्रीय मैदानांची उभारणी!
03:59

Latest news