नफा भांडवलदारांचा आणि बोजा सामान्य जनतेच्या पाठीवर का?

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जून महिन्यातील महागाईच्या दराची आकडेवारी जाहीर केली असून जून महिन्यात किरकोळ महागाईचा दर ४.३८ टक्क्यांनी वाढला आहे. सलग सहाव्या महिन्यात महागाईच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या दीड वर्षामध्ये प्रथमच महागाईचा दर आरबीआयच्या ४ टक्के मर्यादा पातळीवर पोहोचला असून आता व्याजदर वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरून देशात राजकीय वातावरण तापले आहे.

सरकारने आकडेवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी सोशल मीडियावरून भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप सरकारच्या गेल्या १२ वर्षांच्या कार्यकाळात वाढत्या महागाईमुळे सामान्य कुटुंबांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे अशी घणाघाती टीका काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी केली. जीवनावश्यक वस्तूंचे भाव सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाल्याचे ते म्हणाले. वाढत्या महागाईसोबतच आता बँकांकडून व्याजदर वाढवले जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. बँकांनी व्याजदर वाढवले तर, मध्यमवर्गीयांवर घर आणि गाडीच्या एटक चा बोजा आणखी वाढेल. यामुळे त्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडून जाईल, अशी चिंता जयराम रमेश यांनी व्यक्त केली आहे.

देशातील जनतेला महागाईचे तीव्र चटके बसत आहेत. यावरून जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. सर्व नफा भांडवलदारांच्या खिशात जात असून कर्जाचा बोजा मात्र सर्वसामान्य जनतेच्या पाठीवर का टाकला जात आहे? भांडवलदारांचे संरक्षण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वसामान्यांच्या वेदनांवर आणि महागाईवर कधी बोलणार? असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|जुलै महिना, पण बाजारात अजूनही माठांचाच थाट
03:28
Video thumbnail
Latur News|मुरुडमध्ये धक्कादायक प्रकार; दुचाकी थेट नाल्यात
01:03
Video thumbnail
Latur Traffic Police|बूथ तयार... पण पोलीस गायब! लातूरच्या वाहतूक व्यवस्थेचं वास्तव
03:54
Video thumbnail
Latur|कुष्ठधाममध्ये LCB ची धडक; २ किलोहून अधिक गांजा जप्त!
02:10
Video thumbnail
Dharashiv|तावशी गड ग्रामपंचायतीत चार महिन्यांपासून कचरा बकेट पडून; ग्रामस्थांचा जाब
01:07
Video thumbnail
Nanded|फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना फोन करून युवकाने विचारला पक्षांतराबाबत जाब
01:28
Video thumbnail
Nanded|कामारी जि.प. शाळेत शिक्षकांच्या उशिरा हजेरीवर पालकांचा संताप
03:26
Video thumbnail
"फ्लॅट नाही, कार नाही, शेतीही नाही!"... लग्न ठरवण्यासाठी पिंपरीच्या तरुणाचा थेट रस्त्यावर फ्लेक्स!
00:25
Video thumbnail
Parbhani|थकीत सोयाबीन पैशांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
02:13
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये सलून सेवांच्या दरात वाढ; महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय
02:41
Video thumbnail
Explainer|SC उपवर्गीकरणावर महाराष्ट्र का पेटला? | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | संविधान काय सांगतं?
05:41
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूर वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू
02:36
Video thumbnail
Latur|तिसऱ्यांदा कोसळली लोखंडी कमान; तरीही प्रशासन झोपेत?
02:53
Video thumbnail
Latur|तलाठ्याने जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याचा आरोप; पीडित शेतकऱ्याचे आमरण उपोषण
01:54
Video thumbnail
Latur|कर्जमाफीच्या निर्णयानंतर लातूरमध्ये राष्ट्रवादीचा जल्लोष; रोहित पवारांचे मानले आभार
01:51

Latest news