आभा आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवले

सना : अमेरिका आणि इराणमधील यांच्यातील तणावादरम्यान, येमेन आणि सौदी अरेबिया यांच्यात संघर्ष पेटल्याचे पाहायला मिळत आहे. सौदी अरेबियाने येमेनची राजधानी असलेल्या सना येथील विमानतळावर हल्ला केला. यानंतर येमेन देशातील इराण-समर्थित हूती बंडखोरांनी सौदी अरेबियावर मोठा प्रतिहल्ला चढवला. हूतीने सौदी अरेबियाच्या आभा आंतरराष्ट्रीय विमानतळावर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ला केला. यामुळे संपूर्ण परिसरात युद्धाचा धोका अधिकच गडद झाला आहे.

सोमवारी येमेनच्या सना विमानतळावर जोरदार धमाके झाले. हूती बंडखोरांनी असा दावा केला आहे की, सौदी अरेबियाने येथे हवाई हल्ला केला. येमेनच्या अधिकृत सरकारचे संरक्षण मंत्री जनरल ताहिर अल-अकीली यांनी सांगितले की, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्कारावरून परतणा-या हूती शिष्टमंडळाचे विमान सना विमानतळावर उतरणार होते. हे विमान रोखण्यासाठीच धावपट्टीवर हल्ला करण्यात आला. मात्र, ते विमान आपला रस्ता बदलून होदेइदाह विमानतळावर सुरक्षित उतरले. हूती बंडखोरांचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल याह्या सारी यांनी स्पष्ट केले की, सना विमानतळावरील हल्ल्याचा बदला घेण्यासाठीच त्यांनी सौदीच्या आभा विमानतळाला लक्ष्य केले आणि हा हल्ला यशस्वी झाला.

हूतींचा जगातील विमान कंपन्यांना इशारा
सना विमानतळावरील नाकेबंदी जोपर्यंत हटवली जात नाही, तोपर्यंत कोणत्याही विमानाने सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीतून प्रवास करू नये. आमच्या या इशा-याला गांभीर्याने घ्यावे असा इशारा हूतींनी जगातील सर्व विमान कंपन्यांना दिला. सौदी अरेबियाने सना विमानतळावरील हल्ल्याबाबत अद्याप अधिकृतपणे कोणतीही कबुली किंवा प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, या नव्या वादामुळे संपूर्ण आखाती देशांमध्ये युद्धाची ठिणगी पडण्याची भीती वर्तवली जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|जुलै महिना, पण बाजारात अजूनही माठांचाच थाट
03:28
Video thumbnail
Latur News|मुरुडमध्ये धक्कादायक प्रकार; दुचाकी थेट नाल्यात
01:03
Video thumbnail
Latur Traffic Police|बूथ तयार... पण पोलीस गायब! लातूरच्या वाहतूक व्यवस्थेचं वास्तव
03:54
Video thumbnail
Latur|कुष्ठधाममध्ये LCB ची धडक; २ किलोहून अधिक गांजा जप्त!
02:10
Video thumbnail
Dharashiv|तावशी गड ग्रामपंचायतीत चार महिन्यांपासून कचरा बकेट पडून; ग्रामस्थांचा जाब
01:07
Video thumbnail
Nanded|फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना फोन करून युवकाने विचारला पक्षांतराबाबत जाब
01:28
Video thumbnail
Nanded|कामारी जि.प. शाळेत शिक्षकांच्या उशिरा हजेरीवर पालकांचा संताप
03:26
Video thumbnail
"फ्लॅट नाही, कार नाही, शेतीही नाही!"... लग्न ठरवण्यासाठी पिंपरीच्या तरुणाचा थेट रस्त्यावर फ्लेक्स!
00:25
Video thumbnail
Parbhani|थकीत सोयाबीन पैशांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
02:13
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये सलून सेवांच्या दरात वाढ; महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय
02:41
Video thumbnail
Explainer|SC उपवर्गीकरणावर महाराष्ट्र का पेटला? | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | संविधान काय सांगतं?
05:41
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूर वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू
02:36
Video thumbnail
Latur|तिसऱ्यांदा कोसळली लोखंडी कमान; तरीही प्रशासन झोपेत?
02:53
Video thumbnail
Latur|तलाठ्याने जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याचा आरोप; पीडित शेतकऱ्याचे आमरण उपोषण
01:54
Video thumbnail
Latur|कर्जमाफीच्या निर्णयानंतर लातूरमध्ये राष्ट्रवादीचा जल्लोष; रोहित पवारांचे मानले आभार
01:51

Latest news