लातूर : प्रतिनिधी
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी लातूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी अजब तोडगा काढला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाणारे रस्तेच चक्क बंद करुन टाकले आहेत. अवजड वाहने चौकात जाऊ नयेत म्हणुन उड्डाण पुल सुरु होतो तिथे ९ फुट १० इंच उंचीची कमान तिस-यांदा उभी केली होती. तीही अज्ञात वाहनाच्या धडकेत जमीनदोस्त झाली आहे.
लातूर शहरातील वाहतूकीची समस्या सोडविण्यासाठी पोलिसांनी अघोरी प्रयत्न करत छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणारा मार्ग भुयारी मार्गापासून बंद केला, त्यानंतर वाहतूक बंद असलेला उल्लेख कुठेही नसल्याने मोठी वाहने भुयारी मार्गपर्यंत जायची व तिथून त्या वाहनाना रिवर्स घेऊन यावे लागायचे त्यामुळे मोठया प्रमाणात ट्रॅफिक जाम होत होती. यावर उपाय म्हणून उड्डाण पुलाच्या सुरुवातीलाच लोखंडी कमान बसविण्यात आली. मात्र रात्रीच्या अंधारात मोठया वाहन धाराकांना ही कमान न दिसल्याने थेट कामानिवरच वाहन धडकून कमान तुटून खाली पडली. असा प्रकार एकदा नाही तर तीन वेळा घडला आहे.
















