लातूर : प्रतिनिधी
वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणा-या नीट परीक्षेत दयानंद विज्ञान महाविद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली आहे. वेदांत पाटील या विद्यार्थ्याने नीट परीक्षेत ५९५ गुण घेऊन महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याचप्रमाणे शिवम तिवारी या विद्यार्थ्याने ५५५ गुण घेऊन महाविद्यालयातून द्वितीय क्रमांक मिळविला आहे व आयुष गावंड या विद्यार्थ्याने ५४८ गुण घेऊन महाविद्यालयातून तृतीय क्रमांक मिळविला आहे. ५०० पेक्षा अधिक गुण घेणारे १० विद्यार्थी आहेत. प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांने जीवशास्त्र विषयातही उल्लेखनीय कामगिरी करत सर्वोच्च ३६० पैकी ३५६ गुण मिळवले असून, पाच विद्यार्थ्यांनी जीवशास्त्र विषयात ३५० गुण मिळवले आहेत.महाविद्यालयातून ३९० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यातील ३०४ विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.
या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष ललीतकुमार शहा, उपाध्यक्ष रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणी, विशाल लाहोटी, अॅड. श्रीकांत उटगे, अजिंक्य सोनवणे, संजय बोरा, रवींद्र राठी, प्रणव शहा, सी.ई.टी. सेलचे चेअरमन डॉ. चेतनजी सारडा, शैक्षणिक विकास अधिकारी डॉ. जयप्रकाश दरगड, प्राचार्य डॉ. सिद्धेश्वर बेल्लाळे, उपप्राचार्य भाऊसाहेब सरवदे, प्रा. अनिलकुमार माळी, डॉ. हेमंत वरुडकर, डॉ. संध्या कोल्हे, डॉ. कोमल गोमारे, प्रा. एम. टी. बाजपाई, प्रा. कविता जाधव, रवी कुमार आदीसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी कौतुक केले आहे.
















