विद्युत पुरवठ्याअभावी तलावातील पाणीपुरवठा ठप्प

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील पाटोदा बु., सोनवळा व धनगरवाडी परिसरातील साठवण तलावामध्ये सुमारे ८० टक्के पाणीसाठा उपलब्ध असतानाही केवळ विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे पाणी उपसा बंद पडला आहे. त्यामुळे गावांचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला असून शेतीसाठी आवश्यक पाणी मिळत नसल्याने शेतक-यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी संबंधित गावांतील शेतक-यांनी जळकोटचे तहसीलदार तथा दंडाधिकारी यांना निवेदन सादर करून तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.  निवेदनात शेतक-यांनी म्हटले आहे की, साठवण तलावात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असूनही वीज नसल्यामुळे पाणी उपसा करता येत नाही. परिणामी नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. तसेच सध्या खरीप हंगामातील पिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता असून वेळेवर सिंचन न झाल्यास उभी पिके करपून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
शेतक-यांनी प्रशासनास इशारा देत सांगितले की, वीज पुरवठा तातडीने पूर्ववत करण्यात आला नाही तर शेतीसह ग्रामस्थांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न अधिक गंभीर होईल. त्यामुळे महावितरण विभागास तात्काळ सूचना देऊन साठवण तलावावरील विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|राधिका पाटील यांची काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी घेतली भेट
05:32
Video thumbnail
Latur|मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थितीची चाहूल;शेकडो एकर शेती अजूनही पेरणीविना
02:47
Video thumbnail
EXPLAINER | कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळ? महाराष्ट्रात पावसाचं असं चित्र का?
03:22
Video thumbnail
Solapur|केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी DYFIचे अन्नत्याग आंदोलन
02:26
Video thumbnail
MNS Andolan|स्मार्ट मीटरची मनसेकडून होळी; सरकारविरोधात संताप
03:13
Video thumbnail
Latur Murder|लातूरमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार; २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू
02:24
Video thumbnail
Shashikant Shinde|"दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत" – शशिकांत शिंदे
04:10
Video thumbnail
Nanded Teacher sucide|धक्कादायक! शिक्षकाची दोन मुलांसह आत्महत्या; स्टेटसमध्ये वरिष्ठांवर गंभीर आरोप
03:56
Video thumbnail
संत गजानन महाराजांच्या पालखीचे तुळजापुरात भक्तिमय वातावरणात आगमन; जिल्हाधिकाऱ्यांकडून जंगी स्वागत
01:54
Video thumbnail
Nanded|MPSC ऑनलाइन परीक्षेविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार
00:30
Video thumbnail
Ramdas Athawale ON Sharad Pawar|शरद पवारांनी NDA मध्ये यावे, स्वागतच करू" – आठवले
11:50
Video thumbnail
Latur|द्रोणा डिफेन्स अकॅडमीविरोधात मनसेचे आंदोलन
03:19
Video thumbnail
Latur Doctar Suicide|डॉ. मेहुल राठोड मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट!
02:49
Video thumbnail
Latur|पिस्तुल्या महाराजाचा पोलीस कोठडीत मुक्काम वाढला!
02:05
Video thumbnail
Nanded|पाण्यासाठी महिलांचा एल्गार; घागर घेऊन ग्रामपंचायतीवर धडक!
00:32

Latest news