चेअरमन श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते विलास साखर कारखाना युनिट-२ तोंडारचे मिल रोलर पूजन 

उदगीर : प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील तोंडार येथील विलास सहकारी साखर कारखाना युनिट-२ च्या गळीत हंगाम २०२६-२७ वेळेवर अणि पुर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी तांत्रीक कामे  केली जात आहेत. यांच तयारीचा एक भाग म्हणुन  बुधवार दि. २२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता कारखान्याच्या मिल रोलरचे पुजन कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख अणि संचालक मंडळाच्या उपस्थितीत विधीवत मिल रोलर पुजन करण्यात आला. या पुजनानंतर संचालकांच्या उपस्थीतीत गळीत हंगाम तयारी बाबत आढावा बैठकही घेण्यात आली.
विलास कारखाना कार्यक्षेत्रात गळीत हंगाम २०२६-२७ मध्ये कार्यक्षेत्रातील ऊसाचे वेळेवर गाळप होण्यासाठी कारखान्याचे संस्थापक, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक कार्य मंत्री तथा पालक मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, आणि  चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी गळीत हंगाम लवकर सुरु करण्याच्या दृष्ट्रीने तयारी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. या अनुष्ंगाने सर्व हंगामपुर्व यंत्रसामुग्री देखभाल व दुरुस्तीची काम प्रगतीपथावर असुन, मागील गळीत हंगामाप्रमाणेच येणारा हंगाम २०२६-२७ यशस्वी करण्यासाठी सक्षम नियोजन करण्यात येत आहे.
आगामी गळीत हंगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस उपलब्ध आहे. कारखान्याकडे १५ हजार हेक्टर ऊसाची नोंद झालेली आहे. कारखान्याने ऊस तोडणीचे योग्य नियोजन केले असुन, या हंगामात जास्तीत जास्त ऊस हा तोडणी यंत्रणाद्वारे तोडणी करण्यात येणार आहे. भविष्यात ऊसाची उपलब्धता पाहता १०० टक्के ऊस तोडणी यंत्रणाद्वारे केल्यानंतर ऊसाचे गाळप करण्यासाठी आवश्यक आसणारी मशिनरी बसविण्यात येत आहे. या हंगामात तांत्रिक कारणामुळे कारखाना बंद तास कमी राहतील याची दक्षता घेतली जाणार आहे. हंगाम बंद असताना सुरु असलेली मशिनरी देखभाल व दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर असुन, लवकरच कारखाना गळीत हंगामासाठी सज्ज असेल अशी कारखान्याचे कार्यकारी संचालक ए.आर. पवार यांनी माहिती दिली आहे.
लोकनेते विलासराव देशमुख यांची प्रेरणा, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे नियोजन तसेच कारखान्याचे संस्थापक, राज्याचे माजी  मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख आणि चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करत आहे. विलास सहकारी साखर कारखान्याने मागील गळीत हंगामात ऊस उत्पादकांना प्रति मे. टन रु. ३१३१ इतका उच्चाकी दर दिला आहे. यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक-यांमध्ये मोठे आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे. या विक्रमी दरामुळे शेतक-यांच्या अर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत झाली असुन, कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरु आहे.
मील रोलर पुजन कार्यक्रमास माजी आमदार तथा व्हाईस चेअरमन वैजनाथराव शिंदे कार्यकारी संचालक ए. आर. पवार  संचालक, अनंत बारबोले, नरसिंग बुलबुले, रसुल पटेल, सुभाष माने, तात्यासाहेब पालकर, रंजित पाटील, गार्वधन मोरे, दिपक बनसोडे, नेताजी साळुंखे, अमृत जाधव, सतिष शिंदे, लताबाई देशमुख, निमंत्रीत संचालक कल्याण पाटील, पंडीत ढगे, विनोबा पाटील, राजेंद्र पाटील, मारोती पांडे, उदगीर तालुका कॉग्रेस अध्यक्ष संतोष बिरादार व खातेप्रमुख , विभागप्रमुख, कर्मचारी व कामगार यांची मोठया संख्यने उपस्थिती होती.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम: पूर्णा शहरात 'देववन-घनवन' प्रकल्पांतर्गत २,००० वृक्ष लागवडीचा संकल्प
05:14
Video thumbnail
मंगरूळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन; रुग्णवाहिकेचेही लोकार्पण
02:56
Video thumbnail
Nanded Congress Protest|दिल्लीतील लाठीचार्जचे पडसाद नांदेडमध्ये; काँग्रेस रस्त्यावर
01:29
Video thumbnail
Amit Deshmukh|भारतात आता लोकशाही फक्त नावालाच!’ आ.अमित देशमुखांचा भाजपवर पलटवार
01:56
Video thumbnail
Ajitdada Pawar Jayanti|जयंतीदिनीही एकच सवाल... अजितदादांच्या मृत्यूमागचं गूढ कधी उकलणार?
01:19
Video thumbnail
Nanded|नरसीत घराला आग दीड लाख रकमेसह अडीच लाखाचे साहित्य जळून खाक
00:50
Video thumbnail
Latur|धक्कादायक!चाकुर पंचायत समिती कार्यालयासमोर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
04:28
Video thumbnail
Ajitdada Pawar Jayanti|दादांच्या आठवणींना उजाळा; सुनेत्रावहिनी पवार आणि जय पवार भावूक
00:40
Video thumbnail
Latur|भिंतींवर पिचकाऱ्या, दुर्गंधी अन् घाण; लातूरच्या प्रशासकीय इमारतीचा श्वास कोंडला
03:17
Video thumbnail
Latur|पूर्णा येथे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबिर
01:18
Video thumbnail
Parbhani|परभणीतील लक्ष्मी नगरात चारचाकीतून गाईची चोरी;घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
02:59
Video thumbnail
Latur|10 वर्षे विना वेतन सेवा; तीन शिक्षकांचे 24 दिवसांपासून उपोषण
03:16
Video thumbnail
Latur|दिल्लीतील लाठीचार्जचे पडसाद उदगीरमध्ये; बहुजन विकास अभियान रस्त्यावर
02:32
Video thumbnail
Latur|स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आठवडाभर सर्वरोग निदान शिबिर
02:32
Video thumbnail
Latur|FDA च्या कारवाईला न जुमानता सील तोडली; बेकरी मालकावर गुन्हा!
02:07

Latest news