आंदोलकांवर कारवाई होणार नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्लीतील जंतरमंतरवर नीट पेपरफुटी प्रकरणी करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावेळी आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत विद्यार्थ्यांना मारहाण केली. लाठीचार्ज, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. त्यामुळे येथे हिंसाचार झाल्याचे देशाने पाहिले. अखेर आंदोलनकर्त्यांनी मागणी मान्य करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आंदोलन मागेही घेण्यात आले. मात्र, आंदोलक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले, काहींना ताब्यात घेण्यात आले तर काहींना अटक झाली. आता केंद्रीय गृहमंत्रालयाने महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. आंदोलकांवर कुठलाही कायदेशीर कारवाई होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलंय.

दिल्ली सरकारच्या गृह विभागाने नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारांविरोधात झालेल्या आंदोलनांसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला असून, आंदोलकांविरोधात कोणतीही कठोर कायदेशीर कारवाई न करण्याचे स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने २८ जुलै २०२६ रोजी शैलेंद्र मणी त्रिपाठी विरुद्ध भारत सरकार व इतर या प्रकरणात दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर सर्व बाबींचा साकल्याने विचार करून दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला.

दिल्ली सरकारच्या निर्णयानुसार आंदोलनात सहभागी असलेल्या व्यक्तींविरोधात दिल्लीतील कोणत्याही पोलिसांकडून कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार नाही. आंदोलनात सहभागी व्यक्तींविरोधात यापुढे कोणतीही कारवाई प्रस्तावित नसून, हे प्रकरण कायमस्वरूपी बंद करण्यात येत आहे. दरम्यान, २९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहारांच्या संदर्भात झालेल्या आंदोलनांशी संबंधित एकूण १३ गुन्ह्यांची नोंद दिल्ली पोलिसांनी केली होती. मात्र, आता हे गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. दिल्लीच्या उपराज्यपालांच्या मंजुरीने हा निर्णय जारी करण्यात आल्याची माहिती प्रेसनोटच्या माध्यमातून गृह विभागाच्या प्रधान सचिवांनी दिली.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास कारवाई
मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना हे संरक्षण लागू होणार नाही. या प्रकरणांत यापूर्वी अटक, स्थानबद्धता झाली असल्यास संबंधितांची सुटका करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू केली जाईल, असे गृह विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

कॉकरोच जनता पार्टीची मागणी
दिल्लीतील आंदोलनावेळी झालेल्या हिंसाचारानंतर विद्यार्थी व आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, कॉकरोच जनता पार्टीसोबत सरकारच्या शिष्टमंडळाच्या झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयाने ही मागणी मान्य केल्याचे सांगण्यात आले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|धक्कादायक! वर्षभरापूर्वी बांधलेला पूल पुरात तुटला,उमरा–मेट मार्ग बंद; पुरामुळे वाहतूक ठप्प
01:10
Video thumbnail
जळकोट तालुक्यातील तिरु नदीला पूर; पावसाचा जोर कायम राहिल्यास वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका
00:24
Video thumbnail
जळकोटला मुसळधार पावसाने झोडपले; पुराचा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
02:00
Video thumbnail
Nanded|धक्कादायक! थोड्याशा पावसात रस्ता खचला, कार थेट खड्ड्यात
02:08
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये पावसाचा जोर कायम; नदीकाठच्या गावांना अलर्ट!
01:10
Video thumbnail
Latur|लातूरचा 'आंबेडकर चौक' की तळं? थोड्याशा पावसातच रस्ता जलमय!
02:54
Video thumbnail
Latur|अखेर पाऊस धावून आला; वाळणाऱ्या पिकांना मिळालं जीवदान!
02:28
Video thumbnail
Nanded|किनवट-माहूरमध्ये मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा यलो अलर्ट
00:41
Video thumbnail
Nanded|पुलावरून पाणी, तीन गावांचा संपर्क तुटला; नागरिकांचे हाल!
00:35
Video thumbnail
Nanded|अखेर सहस्रकुंड धबधबा प्रवाहित! निसर्गप्रेमींसाठी पर्वणी
00:38
Video thumbnail
Latur|लातूर हादरलं!उड्डाण पुलावरून थेट खाली कोसळले दोन तरुण
02:39
Video thumbnail
Nanded|किनवट हादरलं! पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा १२ तासांनंतरही शोध नाही
01:16
Video thumbnail
Latur|एसटी आरक्षणासाठी धनगर समाज पुन्हा आक्रमक; काळ्या फिती लावून आंदोलन!
01:17
Video thumbnail
Latur|पहिल्याच पावसात मनपाची पोलखोल; नालीचे घाण पाणी थेट रस्त्यावर!
02:22
Video thumbnail
Latur|पाणीपुरवठ्याबाबत चिंता करण्याचे कारण नाही – जिल्हाधिकारी
03:01

Latest news