८ हजार ७०० शेतक-यांनी काढला पीक विमा

जळकोट : प्रतिनिधी
कृषी विभागामार्फत खरीप हंगाम २०२६ साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत असून, जळकोट तालुक्यात आतापर्यंत ८ हजार ७०० शेतक-यांनी पीक विमा काढला आहे. या शेतक-यांनी सुमारे ११ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविला असून, योजनेची अंतिम मुदत ३१ जुलै असल्याने उर्वरित शेतकरीही विमा भरण्यासाठी पुढे येतील का, याकडे लक्ष लागले आहे. जळकोट तालुक्यातील दोन महसूल मंडळांपैकी घोणशी मंडळात ५, ३९० शेतक-यांनी पीक विमा भरला असून ६,८९१ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविण्यात आला आहे तर जळकोट मंडळात ३,३३२ शेतक-यांनी (एकूण आकड्यानुसार) ४,२८४ हेक्टर क्षेत्राचा पीक विमा घेतला आहे. अशाप्रकारे तालुक्यातील एकूण विमाधारक शेतक-यांची संख्या ८,७०० झाली आहे.
तालुक्यात यंदा सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झाल्याने, पीक विम्यामध्येही सोयाबीनचा वाटा सर्वाधिक आहे. मोठ्या प्रमाणात शेतक-यांनी सोयाबीन पिकाचा विमा उतरविला आहे मात्र, गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान होऊनही जळकोट तालुक्यातील केवळ एका मंडळालाच पीक विम्याचा लाभ मिळाला होता. दुसरे मंडळ विमा  लाभापासून वंचित राहिल्याने शेतक-यांमध्ये नाराजी कायम आहे. त्यामुळे  यंदाही विमा भरल्यानंतर प्रत्यक्ष नुकसानभरपाई मिळेल की नाही, याबाबत अनेक शेतकरी साशंक आहेत.
याशिवाय, गेल्या वर्षी एक रुपयात पीक विमा भरण्याची सुविधा होती मात्र यंदा शेतक-यांना स्वत:चा हिस्सा भरावा लागत असून, सोयाबीन पिकासाठी हेक्टरी सुमारे १,२५० विमा प्रीमियम भरावा लागत आहे. आधीच आर्थिक संकटाचा सामना करणा-या शेतक-यांवर हा अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याची भावना व्यक्त होत आहे. पीक विमा भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै असल्याने पुढील दोन दिवसांत किती शेतकरी या योजनेचा लाभ घेतात, याकडे कृषी विभागासह शेतक-यांचेही लक्ष लागले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|धक्कादायक! वर्षभरापूर्वी बांधलेला पूल पुरात तुटला,उमरा–मेट मार्ग बंद; पुरामुळे वाहतूक ठप्प
01:10
Video thumbnail
जळकोट तालुक्यातील तिरु नदीला पूर; पावसाचा जोर कायम राहिल्यास वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका
00:24
Video thumbnail
जळकोटला मुसळधार पावसाने झोडपले; पुराचा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
02:00
Video thumbnail
Nanded|धक्कादायक! थोड्याशा पावसात रस्ता खचला, कार थेट खड्ड्यात
02:08
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये पावसाचा जोर कायम; नदीकाठच्या गावांना अलर्ट!
01:10
Video thumbnail
Latur|लातूरचा 'आंबेडकर चौक' की तळं? थोड्याशा पावसातच रस्ता जलमय!
02:54
Video thumbnail
Latur|अखेर पाऊस धावून आला; वाळणाऱ्या पिकांना मिळालं जीवदान!
02:28
Video thumbnail
Nanded|किनवट-माहूरमध्ये मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा यलो अलर्ट
00:41
Video thumbnail
Nanded|पुलावरून पाणी, तीन गावांचा संपर्क तुटला; नागरिकांचे हाल!
00:35
Video thumbnail
Nanded|अखेर सहस्रकुंड धबधबा प्रवाहित! निसर्गप्रेमींसाठी पर्वणी
00:38
Video thumbnail
Latur|लातूर हादरलं!उड्डाण पुलावरून थेट खाली कोसळले दोन तरुण
02:39
Video thumbnail
Nanded|किनवट हादरलं! पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा १२ तासांनंतरही शोध नाही
01:16
Video thumbnail
Latur|एसटी आरक्षणासाठी धनगर समाज पुन्हा आक्रमक; काळ्या फिती लावून आंदोलन!
01:17
Video thumbnail
Latur|पहिल्याच पावसात मनपाची पोलखोल; नालीचे घाण पाणी थेट रस्त्यावर!
02:22
Video thumbnail
Latur|पाणीपुरवठ्याबाबत चिंता करण्याचे कारण नाही – जिल्हाधिकारी
03:01

Latest news