मोदी-शाह ‘गुंगा गुड्डा’

नवी दिल्ली : जंतरमंतर येथे विद्यार्थी आंदोलनात झालेला लाठीचार्ज, पेलेट गनचा वापर यावरून संसदेमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. राम मंदिर देणगी चोरीचा मुद्दाही गाजत असून विरोधकांनी सत्ताधा-यांना घेरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेमध्ये येऊन यावर निवेदन द्यावे अशी मागणी होत आहे. मात्र पंतप्रधान आणि गृहमंत्री संसदेत अनुपस्थित आहेत. यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मोदी-शाह यांच्यावर हल्ला चढवला आहे.

जंतरमंतरवर लाठीचार्ज कुणी केला, अश्रुधुराच्या नळकांड्या कुणी फोडल्या, पेलेट गन कुणी चालवल्या यावर गृहमंत्री अमित शहा मौन बाळगून आहेत. म्हणते त्यांना गुंगा गुड्डा म्हणावे लागेल. पंतप्रधान मोदींनाही गुंगा गुड्डा म्हणावे लागेल, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी बुधवारी दिल्लीत माध्यमांशी बोलताना केली. संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे संसद ठप्प झाली आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, कामकाज होणार नाही. जंतरमंतरवर लाठीचार्ज कुणी केला, पेलेट गन चालवण्याचे आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्याचे आदेश कुणी दिले हे गृहमंत्री संसदेच्या दोन्ही सभागृहात येऊन सांगत नाहीत तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालणार नाही. राम मंदिर लुटीचाही विषय गंभीर आहे. हा विषय दोन्ही सभागृहात घेतला जात असून यावर सुद्धा पंतप्रधानांना निवेदन द्यावे लागेल, असेही संजय राऊत म्हणाले.

काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘गुंगी गुडिया’ असे म्हणत हिणवल्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार चकमक उडाली आहे. सुनेत्रा पवार यांच्यावरील टीका सहन न झाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट काँग्रेस कार्यालयात धडक देत गोंधळ घातला. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. इंदिरा गांधी यांच्यासारख्या टोलेजंग व्यक्तीमत्वाला सुद्धा गुंगी गुडिया म्हटले होते. त्यांनी हे सहन केले आणि आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केले की मी गुंगी गुडिया नसून स्वतंत्र निर्णय घेणारी, देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी स्त्री आहे. पुढे इंदिरा गांधी यांनी देशाच्या पंतप्रधान म्हणून काम केले त्याच पद्धतीने सुनेत्रा पवार काम करतील, असे संजय राऊत म्हणाले. तसेच काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ले करण्यापेक्षा त्यांनी लोकांच्या प्रश्नाला उत्तर द्यावे. त्यांचा पक्ष अमित शहांचा पक्ष आहे. अमित शहा जसे लपून बसले आहेत, ती भूमिका त्यांनी स्वीकारली आहे का? असा सवालही संजय राऊत यांनी केला.

याला जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन सुरू आहे. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, जंतरमंतवर आंदोलन करण्यापेक्षा राज्याच्या मुख्यमंर्त्याच्या दारात जाऊन आंदोलन केले पाहिजे. कॅबिनेटने हा प्रस्ताव तयार केला आणि उद्धव ठाकरे यांनी हा प्रस्ताव दिल्लीला पाठवला होता. आता ही जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे. नरेंद्र मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाला आले, तेव्हाच दि. बा. पाटील यांच्या नावाची पाटी झळकली पाहिजे होती. ती झळकली का? याला जबाबदार कोण आहे? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आहेत. मिस्टर शिंदे आठवड्यातून सोळा वेळा दिल्लीला येतात. मुख्यमंत्री आठवड्यातून चार वेळा येतात. मग केंद्राच्या विषयाकडे त्यांना हा पाठपुरावा करता येत नाही का? असा सवालही संजय राऊत यांनी केला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28

Latest news