आंदोलनादरम्यान ‘आयएसआय’चा हल्ल्याचा कट

अमृतसर : दिल्लीतील जंतर-मंतरवर मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस आणत, पंजाब पोलिसांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधित दोन सीमापार दहशतवादी मॉड्यूल्सचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार अल्पवयीन मुलांसह एकूण ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अमृतसर पोलिस आयुक्तालयाने केलेल्या या कारवाईत आरोपींच्या ताब्यातून तीन बेकायदेशीर पिस्तूल, जिवंत काडतुसे, चार पेट्रोल बॉम्ब, सीसीटीव्ही कॅमेरे आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त गुरप्रीत सिंग भुल्लर यांनी सांगितले की, ज्यावेळी जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते, त्याचवेळी आरोपी ट्रेनने दिल्लीत पोहोचले होते. पाकिस्तानस्थित हँडलरच्या निर्देशानुसार त्यांना पेट्रोल बॉम्ब पुरवण्यात आले होते. मात्र, दिल्ली पोलिसांच्या उपस्थितीमुळे ते कट यशस्वी करू शकले नाहीत. पोलिसांनुसार, आरोपींना पेटीएमद्वारे आर्थिक मदतही मिळत होती. या निधीच्या स्त्रोताची आणि व्यवहाराची चौकशी केली जात आहे. दुस-या मॉड्यूलचे सदस्य परदेशात बसलेल्या हँडलर्सकडून ऑनलाइन सूचना घेत होते. त्यांच्या ताब्यातून चार पेट्रोल बॉम्ब, एक पिस्तूल, लाइटर आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. प्राथमिक तपासात पोलिस ठाण्यांवर आणि सुरक्षा आस्थापनांवर हल्ल्याच्या कटाचाही खुलासा झाला.

आयएसआय हँडलर्सकडून मिळत होते निर्देश
पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले की, आरोपींचा संपर्क पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधित हँडलर्सशी होता. त्यांना पोलिसांवर हल्ला करण्याचे आणि जंतर-मंतरवर दहशत पसरवण्याचे निर्देश दिले जात होते.

जंतर-मंतरमध्ये स्फोट घडवण्याचा कट होता
तपासात असे समोर आले की, नेटवर्कच्या तारा दिल्लीतील जंतर-मंतरपर्यंत जोडलेल्या होत्या. हँडलर्सनी आरोपींना तिथे सामग्री उपलब्ध करून दिली होती आणि स्फोटाची योजना आखली होती, परंतु दिल्ली पोलीस आणि आरएएफच्या मोठ्या पथकाच्या उपस्थितीमुळे हा कट यशस्वी होऊ शकला नाही.

अमृतसर रेल्वे ट्रॅकची रेकी
टोळीचा पहिला मॉड्यूल अमृतसर रेल्वे ट्रॅकजवळ गुप्त सीसीटीव्ही कॅमेरे लावून लाईव्ह फुटेज पाकिस्तानात बसलेल्या आयएसआय हँडलर्सना पाठवत होता. याचा उद्देश संवेदनशील ठिकाणांची रेकी करून सुरक्षा संबंधित माहिती गोळा करणे हा होता.

शस्त्रास्त्रांसह आरोपी अटक
पोलिसांनी सर्वात आधी वंश कुमार(१९) रा. पट्टी (जिल्हा तरनतारन) नावाच्या तरुणाला अटक केली, ज्याच्याकडून ०.३२ बोअरचे गावठी पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली. त्याच्या माहितीवरून अनमोल सिंग उर्फ साहिल (२०) रा. पट्टी (जिल्हा तरनतारन), हरमन सिंग उर्फ हम्मू (२४), सुखदेव सिंग (३०) रा. गाव झंजोटी (जिल्हा अमृतसर) आणि एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली. तपासात हे देखील समोर आले की काही आरोपी यापूर्वीही बेकायदेशीर शस्त्रास्त्रांच्या प्रकरणात अटक झाले होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28

Latest news