तमिळनाडूत वर्षाला ३ मोफत गॅस सिलिंडर

चेन्नई : तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी सोमवारी विधानसभेत राज्यातील नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजनांची घोषणा केली. यामध्ये पात्र लाभार्थ्यांना वर्षाला 3 मोफत स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा लाभ देण्याबरोबरच महिलांसाठी सुरू असलेल्या मोफत बस प्रवास योजनेचा विस्तार करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

गॅस सिलिंडर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्षाला ३ सिलिंडरची रक्कम थेट जमा केली जाणार आहे. या योजनेमुळे पात्र कुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅसचा खर्च कमी करण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री विजय यांनी वेत्री पयनम या नव्या योजनेचीही घोषणा केली. या योजनेद्वारे महिलांसाठी सध्या सुरू असलेल्या मोफत बस प्रवास योजनेचा संपूर्ण राज्यात विस्तार केला जाणार आहे. वेत्री पयनम योजनेअंतर्गत महानगर आणि शहरी भागांमध्ये धावणा-या एक्स्प्रेस, एलएसएस आणि डिलक्स सरकारी बसमधून महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे. जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी ग्रामीण आणि डोंगराळ भागात धावणा-या साध्या दराच्या सरकारी बसमध्ये महिलांना मोफत प्रवासाची सुविधा मिळणार आहे.

ही योजना २ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त या योजनेची सुरुवात केली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची कोणतीही मर्यादा असणार नाही. तसेच मोफत प्रवासासाठी प्रवासाच्या संख्येवरही कोणतेही बंधन राहणार नाही. तृतीयपंथीयांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री विजय यांनी यापूर्वी निवडणूक जाहीरनाम्यात अनेक कल्याणकारी योजनांची आश्वासने दिली होती. यामध्ये प्रत्येक कुटुंबाला वर्षाला ६ मोफत एलपीजी सिलिंडर देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तसेच २०० युनिटपर्यंत मोफत वीज, ६० वर्षांखालील महिलांना दरमहा २,५०० रुपयांची आर्थिक मदत आणि प्रत्येक कुटुंबासाठी २५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा संरक्षण देण्याचाही समावेश होता.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - धाराशिव
02:18:26
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत- सोलापूर
02:13:30
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35

Latest news