श्रावणामध्ये मटण मागितल्याने वडिलांनी मुलाला संपवले

पुणे : श्रावण महिन्यात मटणाचे जेवण बनवण्याची मागणी केल्यामुळे वडील आणि मुलामध्ये झालेल्या वादाला हिंसक वळण मिळाले. वडिलांनी केलेल्या मारहाणीत ३० वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात घडली.

मृत तरुणाचे नाव महेश भागवत गायकवाड असे आहे. पोलिसांनी त्याचे वडील भागवत सूर्यभान गायकवाड (६४) आणि आई पार्वती भागवत गायकवाड (६०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. वडिलांवर मुलाला मारहाण करून त्याचा जीव घेतल्याचा, तर आईवर पुरावे नष्ट करण्यास मदत केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असल्याचे सांगण्यात आले. घटनेच्या रात्री महेश मद्यपान करून आई-वडिलांच्या घरी आला. त्याने मटणाचे कालवण बनवण्याची मागणी केली.

श्रावण महिना सुरू असल्याने घरामध्ये मांसाहार बनवला जाणार नसल्याचे कुटुंबीयांनी त्याला सांगितले. मात्र, महेशने आग्रह कायम ठेवल्याने वडील आणि मुलामध्ये जोरदार वाद झाला. वादादरम्यान वडिलांनी महेशच्या चेह-यावर आणि डोक्यावर गंभीर मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|नारळी पौर्णिमेला माहूर गडावर भाविकांची अलोट गर्दी; हजारो जण पायी दत्त शिखराकडे
00:39
Video thumbnail
Latur|बुलेटवर फटाका वाजवताय? सावधान! लातूर पोलिसांची थेट कारवाई
01:47
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो लक्ष द्या! १ सप्टेंबरपासून महामार्गावर हेल्मेट सक्ती;हेल्मेट नाही तर दंड
02:38
Video thumbnail
Nanded Murder|नांदेडमध्ये रक्तरंजित थरार! जुन्या वादातून तरुणाचा खंजरने खून
00:50
Video thumbnail
Latur|नांदगाव ग्रामसभेत मोठा गोंधळ! प्रश्नांवरून सत्ताधारी-विरोधक भिडले
07:02
Video thumbnail
PARBHANI|गौरवाच्या क्षणांची साक्ष... सन्मानार्थींच्या प्रतिक्रिया
31:41
Video thumbnail
NANDED|एकमतच्या सन्मानाची... सन्मानार्थींच्या मनातील भावना
45:46
Video thumbnail
DHARASHIV|गौरवाच्या क्षणांची साक्ष... सन्मानार्थींच्या प्रतिक्रिया
42:06
Video thumbnail
Solapur|एकमत वर्धापन गौरव २०२६... सन्मानार्थींच्या प्रतिक्रिया
28:21
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - परभणी
02:04:02
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - नांदेड
02:12:44
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - धाराशिव
02:10:21
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत- सोलापूर
02:13:30
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52

Latest news