परभणी : पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत दि. २९ रोजी सकाळी ८ वाजता स्थानिक गुन्हे शाखा पथक पेट्रोलिंग करीत असताना कोळवाडी गावाकडे जाणा-या एका कारवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत कारमध्से ५ लाख ६३ हजारांचा मुटखा व ११ लाख रुपये किंमतीची कार असा एकुण १६ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुप्त बातमीदारामार्फत एका पांढ-या रंगाच्या कारमध्ये अवैधरित्या गुटखा नेण्यात येत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानंतर पथकाने सापळा रचून सदर संशयित क्रेटा गाडी थांबवून झडती घेतली. यामध्ये विमल, राजनिवास, डायरेक्टर, रजनीगंधा कंपनीचा ५ लाख ६३ हजार रुपयांचा गुटखा व वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी क्रेटा गाडी किंमत ११ लाख रुपये असा एकूण १६ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पो. स्टे. पालम येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, अपर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशा पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या पथकातील पोउपनि. चंदनसिंह परिहार, पोलिस अंमलदार महेश कवठाळे, माणिक वाघ, सचिन भदर्गे, दिलीप निलपत्रेवार, इम्रान यांनी पार पाडली.
















